Download App

“फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारलं..”, आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार धस यांनी केला.

Suresh Dhas Press Conference : परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण राज्यात (Mahadev Murder Case) चर्चेत आहे. काल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी (Suresh Dhas) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. फक्त 12 गुंठे जमिनीसाठी ही हत्या झाली असा खळबळजनक दावा आमदार धस यांनी केला आहे. वाल्मिक कराड आणि गोट्या गिते यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आणखी एक दावा धस यांनी केला आहे.

धस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात खळबळजनक दावे केले आहेत. या प्रकरणी विजयसिंह बांगर यांनी आरोप केले होते. याबाबत विचारले असता धस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला.

माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही, तो मु्ंबईला.. अपघातानंतर सुरेश धसांनी काय सांगितलं?

गोट्या गित्त हा एक सायको किलर आहे. फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारण्यात आलं. तो एक गरीब माणूस होता. या प्रकरणात आता आणखी माहिती समोर येत आहे. यात गोट्या गित्ते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटाम मुलगा या सगळ्यांची नावं बाळा बांगर जो आकाबरोबर फिरत असायचा त्याने माध्यमांसमोर आणली आहे. मी जेव्हा आकाला भेटायला गेलो तेव्हा एक माणसाचं चमडं, हाडं आणि त्याचे रक्त यांच्या टेबलवर होते हे सगळं बाळा बांगर बोलले आहेत. यानंतर त्यांनी तक्रार दिली होती.

त्याचवेळी आरोपींना का उचललं नाही

ज्ञानेश्वरी ताईंनी पोलिसांत जाऊन माझ्या नवऱ्याचं काय झालं याबाबत विचारलं. न्याय मिळावा म्हणून मागील दोन वर्षांपासून ती माऊली आणि तिचा भाऊ दोघेच लढत आहेत. काल त्या ताईने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुढे देण्यात आला. आता पोलीस सांगतात की गोट्या गित्तेला पकडण्यासाठी टीम पुण्याला पाठवली आहे. पण ज्या दिवशी बाळा बांगरने वक्तव्य केलं त्या दिवशीपासून आरोपी फरार झाले. मग त्याच वेळी या आरोपींना का उचलले नाही असा सवाल आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला.

महादेव मुंडे हत्या प्रकरण : ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपासा, सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

follow us