Sambhajinagar Loksabha : मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्यामुळे पराभव पत्कारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलयं. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटलांनी आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केलीयं. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.
भाजपला महाराष्ट्र टफ! भाजपाचा ‘रिव्हर्स’ गिअर, तर ‘मविआ’त ‘फिलगुड’; नव्या अहवालात काय?
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुढी उभारुन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केलं आहे. यावेळी जाधवांनी आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा
काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक विधान केलं होतं. लोकसभा निवडणुकीबाबत शांतगिरी महाराज आणि मराठा समाजाच्या भूमिकेनंतर आपण निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांनी कार्यालयाचे उद्घाटन करीत मोठी घोषणा केली आहे.
सांगलीच्या जागेवरून मविआत धुसफूस! विशाल पाटील बंडखोरी करणार?
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 83 हजार 798 मताधिक्य घेतलं होतं. त्यावेळी निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर वंचितच्या युतीमुळे एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा भरगोस मतांनी विजय झाला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अधिकच मताधिक्य घेतल्यानेच खैरे यांचा पराभव झाल्याचं मानलं गेलं. आताही हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर 2019 चीच पुनरावृत्ती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.