Chhatrapati Sambhajinagar Crime News : झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेपोटी चक्क करोडोंना चुना लागलाय. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडली. 700 ते 800 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यांना करोडो रूपयांचा गंडा घातला (Broking Company) गेलाय. एका ब्रोकिंग कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवलं (Crime News) होतं. त्यालाच बळी पडत अनेकांनी पैसे गुंतवले होते.
छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणूकीचा प्रकार उघडकीस आलाय. निफ्टी गुरुजी शेयर मार्केट क्लासेसच्या संचालकांनी गुणतवणुकदारांची तब्बल दिड कोटी रुपयांची फसवणूक केली (Chhatrapati Sambhajinagar News) आहे. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.
अजब मंत्री, गजब कारभार! तब्बल 20 महिने सांभाळलं ‘अस्तित्वात नसलेलं खातं’
ऑगस्ट 2022 ते जून 2023 या दरम्यान एल एफ एस ब्रोकिंग नावाच्या कंपनीच्या संचालकांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे निफ्टी गुरुजी शेयर मार्केट क्लासेसच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. परंतु या कंपनीकडून कुठलाही परतावा मिळाला नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच सुभाष भास्कर तौर या युवकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या युवकासह आणखी 24 जणांची जवळपास 1,44,50,000 रुपयांची फसवणूक केली गेली आहे. त्याच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे शाखेने दखल घेत वेदांत नगर पोलीस ठाण्यात एल एफ एस ब्रोकिंग या कंपनीच्या जबाबदार व्यक्ती म्हणून जियापूर रहेमान (राहणार वेस्ट बंगाल), सोनल भक्ता (राहणार गुजरात), सौमित्र सिन्हा, सौरव अधिकारी, सेजल मॅगजी देसर चंद्रा, दिलीपकुमार मैती, तर या कंपनीत महाराष्ट्र हेड म्हणून कार्यरत असलेल्या विनोद बाळासाहेब माने आण निफ्टी गुरुजी शेयर मार्केट क्लासेसचा ब्रांच हेड विनोद त्रिंबक साळवे यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर NO अश्लील कटेंट! इन्फ्लुएंर्सना मोठा झटका, सरकार करतंय जोरदार तयारी
तर या प्रकरणात आणखी 700 ते 800 गुंतवूकदारांनी गुंतवणूक केली असल्याचं समजतं. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत. 24 गुंतवणूकदारांची जवळपास 1 कोटी 44 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली गेलीये. या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आजकाल अनेकजण जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करतात. त्यामुळं त्रयस्थांमार्फत गुंतवणूक करतांना गुंतवणूकादारांनी आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी म्हटलंय.