Download App

”मी राज ठाकरे नाही; मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाणावर लढणार नाही”

मी मेलो तरी चालेल पण इतर कुणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Image Credit: letsupp

Mahadev Jankar on symbol : आपण कुणाच्या मोठ्या महालात जाऊन कुणाचं गुलाम होण्यापेक्षा आपल्या झोपडीत राहून मालक असलेलं कधीही चांगल असं म्हणत आपण कधीच इतर कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असा निर्धार महायुती पुरस्कृत परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Mahadev Jankar) तसंच, मी काही राज ठाकरे (Raj Thackeray) नाही असा टोलाही जानकर (Parbhani Loksabha) यांनी यावेळी राज ठाकरे यांना लगावला आहे.

 

Madha Lok Sabha : जानकरांना कोण आमदार करंतय ? जयसिंह मोहितेंची कथित क्लिप व्हायरल

इतर पक्षांची युती करतो

मला गोपीनाथ मुंडे यांनी बारामतीच्या निवडणुकीवेळी कमळ चिन्हावर लढा असं सांगितल होत. मात्र, मी त्याला नकार दिला होता अशी आठणही जानकर यांनी यावेळी सांगितली. यावेळी जानकर म्हणाले, माझी विचारसरणी वेगळी असून ती लक्षात घेऊनच मी इतर पक्षांची युती करण्याचा निर्णय घेतो. परंतु, मी कधी कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही.

 

माझ्याच पक्षाच्या चिन्हावर दिल्लीला जाणार

यावेळी जानकर यांनी आपण मेलो तरी चालेलं पण कमळ, हात आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्यही जानकर यांनी यावेळी केलं. आज मी माझ्या पक्षाकडून आमदार आहे. माझे चार आमदारही माझ्याच चिन्हावर निवडून आले. आता मी सुद्धा खासदार म्हणून दिल्लीला जाईल तो माझ्या पक्षाच्या चिन्हावरच असंही जानकर यावेळी म्हणाले आहेत.

 

परभणीत हायहोल्टेज ड्रामा! चिडलेल्या जानकरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, नेमकं काय घडलं?

विजयाची हॅट्रीक होणार का ?

लोकसभेसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यात परभणी मतदारसंघात मतदान झालं. येथे परभणीमध्ये महायुतीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव यांच्यात ही लढत झाली आहे. संजय जाधव गेल्या 10 वर्षांपासून परभणीचे खासदार आहेत. त्यामुळे विजयाची हॅट्रीक करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर, पहिल्यांदाच महादेव जानकर परभणी लोकसभेतून लढत आहेत.

follow us

वेब स्टोरीज