परभणीत हायहोल्टेज ड्रामा! चिडलेल्या जानकरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, नेमकं काय घडलं?

परभणीत हायहोल्टेज ड्रामा! चिडलेल्या जानकरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, नेमकं काय घडलं?

Parbhani Lok Sabha : परभणी मतदारसंघात महायुतीने महादेव जानकर यांना (Mahadev Jankar) तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव यांनी (Sanjay Jadhav) शड्डू ठोकला आहे. दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. इतकेच नाही तर असेही काही प्रसंग घडू लागले आहेत की वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहे. कालही परभणीत असाच हाय होल्टेज ड्रामा रंगला ज्याचा शेवट पोलीस ठाण्यात झाला.

त्याचं असं झालं, महादेव जानकर यांची गाडी परभणी शहरात आली असता शिवसेनेच्या काही तरुणांनी तपासली. त्यावरुन येथे काही काळ तणाव निर्माण झाला. अशा पद्धतीने गाडी अडवून चेक करणं योग्य नाही असे म्हणत जानकरांनी तडक पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Maharashtra Politics : ‘2015 नंतर राष्ट्रवादीत निवडणुकाच नाहीत’; तटकरेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

ज्यावेळी त्यांच्या वाहनाची तपासणी केली जात होती तेव्हा जानकर तिथे उपस्थित नव्हते. त्यांचे पीए आणि वाहनचालक दोघेच होते. या घटनेची माहिती समजताच महादेव जानकरांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हा प्रकार योग्य नाही असे म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. यानंतर वाहनचालकाने फिर्याद दिली. या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी जानकरांनी केली.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सु्मारास हा प्रकार घडला. जानकर एका कार्यकर्त्याच्या घरी जेवायला थांबले होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली. गाडीतून पैसे वाटायला जाताय का, असा संशय आल्याने तपासणी केली. गाडीतील महत्वाची कागदपत्रे फाडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला असा आरोप जानकरांनी केला. हे सगळे लोक खासदार संजय जाधव यांचे कार्यकर्ते होते असाही आरोप जानकर यांनी केला.

Mahadev Jankar यांच्यासाठी अजित पवार भर उन्हात रिंगणात तर विटेकरांनाही दिलं आश्वासन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube