Madha Lok Sabha : जानकरांना कोण आमदार करंतय ? जयसिंह मोहितेंची कथित क्लिप व्हायरल
Madha Lok Sabha Jaysingh Mohite Patil Audio clip : तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. या टप्प्यात माढा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकरविरुद्ध (Ranjitsingh Nimbalkar) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते यांच्यामध्ये (Dhairyasheel Mohite-Patil) लढत होत आहे. या मतदारसंघात भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार प इतर नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. काल प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर मोहिते कुटुंबातील जयसिंह मोहिते पाटील (Jaysingh Mohite Patil) यांच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
शेवटच्या क्षणी राणेंना उमेदवारी मात्र विधानसभेत आम्ही … रामदास कदमांचा थेट महायुतीला इशारा
त्यात जयसिंह मोहिते एका जणांबरोबर बोलताना जानकरांना कोण आमदार करतंय, जनता येडी आहे. कार्यकर्त्यांना काही कळत नाही, असे ते म्हणत आहे. माळशिरसचे उत्तमराव जानकरांबरोबर ते असे म्हणतायत, असे दिसून येत आहे. उत्तमराव जानकर यांचे मोहिते कुटुंबाबरोबर राजकीय वैर आहे. ते आधी भाजपच्या संपर्कात होते. त्यानंतर शरद पवार गटाकडे गेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांना पाठिंबा देत मोहिते कुटुंबाबरोबर वैर संपल्याचे जाहीर केले होते. उत्तमराव जानकरांना माळशिरसमधून उमेदवारी देण्याचा शब्द शरद पवार गटाने दिल्याचे सांगितले जात आहेत. एेन मतदानाच्या एक दिवस आधी एक क्लिप व्हायरल झाली आहे.
राणेंच्या उमेदवारीची उणीव विधानसभेला भरून काढू; फडणवीसांनी शब्द दिल्याचा रामदास कदमांचा दावा
काय म्हणाले क्लिपमध्ये ?
एक कार्यकर्ता जयसिंह मोहिते यांना विचारतो दादा लोक फारच नाराज आहेत, जानकरांचा काय करायचे आहे? त्यावर जयसिंह मोहिते म्हणतात…निवडून तर आम्ही येत आहे. आम्ही का कमळाला सोडून तुतारी हातात घेतली आहे. लोकं तर येडी आहेत. या कार्यकर्त्यांना काही नाही कळत. ते जानकर आले कोण त्याला आमदार करतंय. त्याला काय आम्ही आमदार करत नसतो. आता भैयासाहेबांच्या आमचा हट्ट होता खासदार व्हायचं, करा म्हटलं तुमच्या मनासारखं. रणजितदादाला म्हटलं तू थांब तिकडे तू नको येऊ, असे क्लिपमध्ये संभाषणमध्ये म्हटले आहे. ही कथित क्लिप मतदारसंघात जोरदार व्हायरल झाली आहे. परंतु ही क्लिप किती खरी आहे की खोटी हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. क्लिपमुळे माळशिरसमधून उत्तमराव जानकरांना मानणारे कार्यकर्ते हे संभ्रम अवस्थेत आहे.