Download App

Income Tax ची मोठी कारवाई; कर चुकवणाऱ्या भंडारींची 72 तासांत 170 कोटींची मालमत्ता जप्त

Income Tax मराठवाड्यातील नांदेडमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने मोठी छापेमारी ( Raid ) केली.

Income Tax Raid in Nanded : मराठवाड्यातील नांदेडमध्ये ( Nanded ) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने ( Income Tax ) मोठी छापेमारी ( Raid ) केली. यामध्ये एकाच वेळी सात ठिकाणी फायनान्स कंपनी चालवणाऱ्या भंडारी कुटुंबीयांच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली. तब्बल 72 तास चाललेल्या आयकर विभागाच्या या कारवाईमध्ये भंडारी कुटुंबीयांकडे तब्बल 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली.

Ghatkopar Hoarding : ढिगाऱ्यात आणखी दोन मृतदेह सापडले; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

त्यामध्ये 14 कोटी रोग आठ कोटींच्या बारा किलो दागिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आयकर विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. नांदेडमध्ये राहणाऱ्या या भंडारी कुटुंबियांची एक फायनान्स कंपनी आहे. त्याचबरोबर त्यांचा मराठवाड्यामध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. तर या फायनान्स कंपनीमध्ये भंडारे यांचे सात ते आठ नातेवाईक देखील सहभागी आहेत.

Zhad Movie: ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मात्र या कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करण्यात आले आहे. आयकर देखील चुकवण्यात आला होता त्यामुळे आयकर विभागाकडून या कुटुंबीयांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आयकर विभागाच्या तब्बल 80 अधिकाऱ्यांच्या पथकाद्वारे नांदेडमध्ये ही कारवाई करण्यात आली.

नांदेडमधील शिवाजीनगर भागामध्ये अली भाई टॉवर या ठिकाणी भंडारी यांच्या या फायनान्स कंपनीचं मुख्य ऑफिस आहे. यासह शहरातील भंडारी कुटुंबीयांच्या मालकीच्या सहा ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. ज्यामध्येही तब्बल 170 कोटींची मालमत्ता बेहिशेबी सापडली आहे. तर ही सर्व कारवाई करण्यासाठी आयकर विभागाला 72 तास तर रक्कम मोजण्यासाठी 14 तासांचा कालावधी लागला आहे.

follow us

वेब स्टोरीज