Download App

Amol Shinde : भावी पोलिस घरातून निघाला अन् संसदेत धूर सोडताना घावला…

Amol Shinde : दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) आज देशातील चार तरुणांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. दोन जणांनी हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी घेत स्मोक कॅंडलद्वारे धुर (Parliament Security Breach) सोडला. या प्रकरानंतर देशात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या तरुणांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यापैकीच एक असलेला अमोल शिंदे (Amol shinde) हा लातूरचा आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून या प्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आल्यानंतर लातूर पोलिसांनी थेट अमोल शिंदेंच्या घरी मोर्चा वळवला आहे.

या घटनेनंतर लातूर पोलिस चाकूर तालुक्यातील झरी गावात दाखल झाले आहेत. पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडीलांकडून त्याच्याविषयी माहिती घेतली आहे. यादरम्यान घरात झाडाझडती घेत असतान काही कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यावरुन अमोल शिंदे हा पोलिस भरतीची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमोल घरी नव्हता. तो शिक्षणासाठी बाहेर असल्याचं समोर आलं आहे. मात्र, आज अचानक संसदेत शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा…’; राष्ट्रवादीचा केंद्र सरकारला थेट सवाल

अमोल धनराज शिंदे असं त्याचं पूर्ण नाव असून घरची परिस्थिती बिकट आहे. त्याचे आई-वडील मोल-मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. अमोल शिंदे याचं शिक्षण सुरु होतं. अमोलबाबत गावातील इतर लोकांना माहिती विचारली असता त्याची पूर्ण माहिती समोर येऊ शकलेली नाही. तो अनेक दिवसांपासून काय करत होता याची कोणाला माहिती नाही. यासोबत इतर नातेवाईकांशीही चर्चा केली मात्र, कोणालाही त्याची माहिती नसल्याचं समोर आलं. त्याला गावात आवडत नव्हतं असं तपासात समोर आलं आहे.

Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर जादू; ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी

दरम्यान, मागील काही दिवसांपासून तो पोलिस भरतीची तयारी करीत होता. अनेक दिवसांपासून गाव आणि घरच्यापासून लांबच होता. मागील 15 दिवसांपूर्वी तो दिल्लीला जात असल्याचं आई-वडिलांना सांगून गेला होता. पण तो दिल्लीत का चालला आहे, त्याचं काय काम होतं? त्याच्यासोबत कोण होतं? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Tags

follow us