‘संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा…’; राष्ट्रवादीचा केंद्र सरकारला थेट सवाल
Parliament Security Breach: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेचं कामकाज सुरू असतांना दोन अज्ञातांनी सुरक्षा व्यवस्थेला बगल देऊ सभागृहात उड्या मारल्या. या अज्ञातांनी सभागृहात स्मोक बॉम्ब (Smoke bombs) फेकून धुर केल्या. दरम्यान, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या घटनेमुळं विद्यमान सभापती राजेंद्र अग्रवाल (Rajendra Aggarwal) यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. यानंतर ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा कामकाज सुरू झाले. या सर्व घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने एक पोस्ट केली आहे. त्यात लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची टीका राष्ट्रवादीने केली.
नव्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक, असा घडला ‘घटनाक्रम’
राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर एक पोस्ट टाकण्यात आली. त्यातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिलं की, देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आज घडलेल्या घटनेतून गांभीर्याने लक्षात आले. प्रेक्षक गॅलरीतून दोन अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून एकच गोंधळ उडवला, ज्यामुळं लोकसभा सदस्यांना त्याचा त्रास भोगावाा लागला.
Mumbai : लोकमान्य टिळक टर्मिनसला भीषण आग; बचावासाठी प्रवाशांची धावपळ
पुढं लिहिलं की, देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा त्रुटी राहिल्याने केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांची देशाच्या सुरक्षिततेबाबत असणारी गांभीर्यता यातून लक्षात येते आणि पुन्हा सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येते. सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल, हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा.
देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आज घडलेल्या घटनेतून गांभीर्याने लक्षात आले. प्रेक्षक गॅलरीतून २ अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून एकच गोंधळ उडवला, ज्यामुळे लोकसभा सदस्यांना त्याचा त्रास भोगावा लागला.
देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत… pic.twitter.com/Z7ERiTNW2A
— NCP (@NCPspeaks) December 13, 2023
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन बसतात तेथे उड्या मारल्या. कामादरम्यान घुसखोरी करणाऱ्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदारांच्या नावाने लोकसभेच्या व्हिजिटर पासवर संसदेत आले होते. खासदार दानिश अली म्हणाले की, या दोघांनी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने लोकसभेचे अभ्यागत पास आणले होते.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून हॉलमध्ये उडी मारली. त्यांनी काहीतरी फेकले ज्यातून गॅस बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. यानंतर सभागृहाचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी माहिती दिली की, घुसखोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं असून या त्यांची चौकशी सुरू आहे