छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी सोडत जाहीर; वाचा, कुणाला किती सुटल्या जागा

या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश इच्छुक खुश होते. प्रभाग रचना असल्याने अॅडजस्टमेंट होईल म्हणून बरेच जण आशावादी आहेत.

News Photo   2025 11 11T155731.141

News Photo 2025 11 11T155731.141

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 29 प्रभागातल्या 115 नगरसेवकांसाठी (Election) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात 58 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत, तर 57 जागा या खुल्या असतील. त्यामध्ये सर्वसाधारण महिला 30, सर्वसाधारण पुरुष 30, ओबीसी महिला 16 तर ओबीसी पुरुष 15, अनुसूचित जाती आरक्षणामध्ये 11 पुरुष आणि 11 महिला नगरसेवकांसाठी आरक्षण असेल.

या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश इच्छुक खुश होते. प्रभाग रचना असल्याने अॅडजस्टमेंट होईल म्हणून बरेच जण आशावादी आहेत. कारण राखीव असो किंवा सर्वसाधारण खुला असेल, त्या ठिकाणी दोन महिला आणि दोन पुरुष असं आरक्षण या प्रभाग रचनेत असल्यामुळे अडचण होणार नाही अशी अटकळ बांधून आहेत.

मोठी बातमी, भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

काही प्रभागात मागील वेळेचे पुरुष नगरसेवकांच्या जागी त्यांची आता धुरा त्यांच्या पत्नी सांभाळू शकतात असं चित्र आहे. या सोडतीत मात्र माजी महापौर नंदकुमार घोडले यांचा 29 क्रमांकाचा प्रभाग OBC आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. तर अनुसूचित जातीसाठी पुरुष आरक्षण निघाले. त्यामुळं नंदकुमार घोडेले यांना धक्का बसला. या प्रभागातून निवडणुकीला त्यांना उभारणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडले या उमेदवार असू शकतात.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या – 115

महिलांसाठी राखीव- 58

सर्वसाधारण महिला – 30

ओबीसी महिला – 16

अनुसूचित जाती महिला – 11

अनुसूचित जमाती महिला – 1

खुल्या जागा – 57

सर्वसाधारण पुरुष – 30

ओबीसी पुरुष – 15

अनुसूचित जाती पुरुष – 11

अुनुसूचित जमाती पुरुष – 1

एकूण सदस्यसंख्या – 115

Exit mobile version