महिलांसाठी खुशखबर; महिन्याला मिळणार 2500 रुपये, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची घोषणा

महिलांसाठी खुशखबर; महिन्याला मिळणार 2500 रुपये, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची घोषणा

Delhi BJP Govt : दिल्ली निवडणुकीत संकल्प पत्रात महिला समृद्धी योजनेची घोषणा भाजपने केली होती. त्या पार्श्वभूमीवर महिला दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली. (Delhi ) यात गरीब महिलांना अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आता यावर शिक्कामोर्तब झालंय. दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात यासाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे दिल्लीतील गरीब बहिणींना समृद्धी योजनेचा लाभ देता येणार असल्याचं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. या कार्यक्रमावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेसुद्धा उपस्थित होते.

जेपी नड्डा म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात महिलांचा वाटा वाढला आहे. महिलांनी भाजपवर विश्वास ठेवला. देशात भाजपच्या महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. महिलांशिवाय जिंकणं शक्य नव्हतं. भाजपकडे सर्वाधिक महिला खासदार आहेत. महिला आता मुख्य प्रवाहाचा भाग आहेत.

लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशाने दिलेली लाच, या योजनेमुळे सामाजिक योजनांना कात्री; राजू शेट्टींचा आरोप

दिल्लीतील आधीच्या सरकारवर जेपी नड्डा यांनी टीका केली. ते म्हणाले की, काही काळापूर्वीच दिल्लीला आपत्तीतून दिलासा मिळालाय. महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी ५ हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद मंजूर केली आहे. लवकरच ही योजना लागू केली जाईल आणि प्रत्येक महिलेला २५०० रुपये मिळतील.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, १९९३ पासून मी संघटनेत काम करतेय. लग्नानंतर जेव्हा कुटुंबात मी आले तेव्हा मला संघटनेनं परत बोलावलं आणि सार्वजनिक सेवा करायला लावली. ३० वर्षात पक्षाने अनेक पदं दिली. पक्षात महिला खूप काही करतात. कधी कधी असंही होतं की तिकिट न देता कुणी बाहेरून आलेल्या व्यक्तीला तिकिट दिलं जातं. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतायत. दिल्लीत मला मुख्यमंत्री बनवून अर्थसंकल्प ठेवण्यालायक बनवलं असंही रेखा गुप्ता म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube