Nitin Gadkari Jalna Lok Sabha Speech : ‘मी राज्यात मंत्री होतो. केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं. देशाच्या प्रत्येक गावाला मजबूत रस्त्याने जोडण्यासाठी योजना तयार करा. त्यानंतर मी योजनेवर तीन महिने काम केलं. रिपोर्ट सरकारला पाठवून दिला. त्यानंतर तेव्हाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली, त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जालन्यातील सभेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची हिस्ट्री सांगितली.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. गडकरी म्हणाले, काँग्रेस पक्षाला देशात साठ वर्षे सत्ता भोगण्याची संधी मिळाली. काँग्रेस नेत्यांनी गरीबा हटावचा नारा दिला. पण गरीबी हटली नाही. देशाचा विकासही झाला नाही. साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते काम मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारने करून दाखवलं. दानवेंनी अनेक योजना मार्गी लावल्या. मराठवाड्यात रस्त्याची कामं त्यांच्या काळात झाली.
यवतमाळच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ; औषधोपचार घेऊन परतले अन् ठोकलं दमदार भाषण
फक्त स्मार्ट शहरेच नाही तर स्मार्ट खेडे झाले पाहिजेत. हे ध्येय मोदींजींनी ठेवलं आहे. मी महाराष्ट्रात मंत्री होतो. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं देशाच्या प्रत्येक गावाला मजबूत रस्त्याने जोडण्यासाठी योजना तयार करा. मग मी तीन महिने या योजनेवर काम केलं. रिपोर्ट दिला. त्यानंतर अब्दुल कलाम यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. ज्या योजनेतून अनेक गावांना रस्ते झाले. देशातील साडेसहा लाख गावांपैकी साडेचार लाख गावांना रस्त्याने जोडण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून झालं, असे गडकरी म्हणाले.
आमच्या सरकारने कधीच कुणावर अन्याय केला नाही. काँग्रेसकडून मात्र चुकीचा प्रचार केला जात आहे. या अपप्रचारापासून दूर राहा. दहा वर्षात आमच्या सरकारने अनेक योजना आणल्या. यात आम्ही भेदभावाचा निर्णय कधीच घेतला नाही. रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत अतिशय उत्तम काम केलं आहे. मंत्री म्हणून राज्यातले अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत, असेही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरींच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ, गडकरींची संपत्ती तरी किती?