Download App

Manoj Jarange : “चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो”; SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा. चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. फोन कॉलवर काय काय बोलले मी पण उघड करतो. आता म्हणाले तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

मनोज जरांगेंचा बोलवता धनी शोधणार : फडणवीस 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी, त्यांनी केलेल्या आरोपांशी आणि त्यांनी वापरलेल्या भाषेशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. पण यामागचा बोलवता धनी शोधणार आहे. लाठीचार्जची घटना झाल्यानंतर कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, कोण त्यांना रात्री त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांना रात्री उठवून परत आंदोलनाला कोणी बसवले या सगळ्या गोष्टींचा शोध घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिला आहे.

जरांगेंवर आरोप करणाऱ्यांचीही चौकशी करा 

जरांगे पाटील यांनी जे बोललं, ते उद्रेकातून बोलले आहेत. जर त्यांच्यावर आरोप होत असतील तर ते बोलणार. पण काही शक्ती त्यांच्यामागे असेल असे तुम्ही म्हणत असाल तर चौकशी करा. आमचंही समर्थन आहे. पण हे जे आंदोलन पेटलंय त्याच्यामागे कोण याचीही चौकशी करा. जे जरांगे पाटलांवर आरोप करताहेत ती कुणाची माणसं आहेत याचीही चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Manoj Jarange : सग्यासोयऱ्यांच्या अंमलबाजवणी शिवाय सरकारची सुट्टी नाही, कालचं आरक्षण कुणबी नको म्हणणाऱ्यांसाठी

follow us