Download App

Manoj Jarange : “मी कोणत्याच पक्षाचा नाही, मराठा समाजाला”… मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘मी फक्त समाजाचं काम करतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मी एका सामान्य घरातून आलो आहे. मी समाजावर प्रेम करतो म्हणून हे घडलं आहे. मी जर स्वार्थी किंवा लबाड असतो तर मागेच उघडा पडलो असतो. समाजावर माझी निष्ठा आहे. त्यामुळेच समाजाचं माझ्यावर प्रेम आहे. मराठा समाजाला हरवण्याचं स्वप्न कुणीतरी पाहत आहे. त्यामुळे ही बैठक 3 तारखेनंतर घ्यायची होती ती आताच घ्यावी लागत आहे. मी कोणत्याच पक्षाचा नाही’, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange : सग्यासोयऱ्यांच्या अंमलबाजवणी शिवाय सरकारची सुट्टी नाही, कालचं आरक्षण कुणबी नको म्हणणाऱ्यांसाठी

जरांगे पाटील पुढे म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर एक मिनिटाच्या आत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच अनेक जणांनी भाजप सोडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडण्याचे कामही फडणवीस यांनीच केले. राज्य सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

‘मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला आता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा टक्के आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

‘राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. पण ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे. राज्य सरकारनेच सांगितलं होतं की सरसकट मिळत नाही म्हणून सगेसोयरे शब्द दिला. हे सगळं एकटा देवेंद्र फडणवीस करतायत’, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ‘मराठा समाजाला संपवण्याचं काम सध्या सुरू आहे. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांचेही काही लोक आहेत. काही समन्वयकही यात सहभागी आहेत. मला बदनाम करण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतील. फडणवीस म्हटले तर नारायण राणे सुद्धा काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंनाही हे दोन काहीच करू देत नाहीत’, असेही जरांगे पाटील म्हणाले.

follow us