Manoj Jarange On Narendra Modi: राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज शिर्डीत आले होते. पण राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी हे एक शब्दही बोलेले नाहीत. त्यावरूनही जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात येऊन आरक्षणावर बोलतील असे वाटत होते. परंतु ते बोलले नाहीत. येथे येऊन आरक्षणाबाबत सांगू शकत नाहीत. तेथून काय सांगणार असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे.
जरांगे म्हणाले, पंतप्रधान हे गोर-गरीबांचे प्रश्न सोडवतील. गोरगरीबांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे, असे वाटत होते. परंतु हा गैरसमज होता. तो आता गोर-गरीबांचा दूर होईल. मराठ्यांचाही गैरसमज निघून जाईल. मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारला फोन करून सांगा, संदेश पाठवा, अशी विनंती केली होती. ते येथे येऊन सांगू शकत नाही, तेथून काय सांगणार आहे.
‘किती हा विरोधाभास’; जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर
देशातील सर्वोच्च माणूस महाराष्ट्रात येतो. त्यांना येऊ देण्याची मुभा मराठ्यांनी दिली होती. चांगला माणूस आहे म्हणून मराठ्यांनी त्यांना महाराष्ट्रात येऊ दिले. मराठ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होती. नाही तर मराठ्यांना त्यांना महाराष्टात येऊ दिले नसते. बरे झाले मराठ्यांची झाक जाण्याची गरज होती. आता आमच्या लक्षात आले आहे. कोणावर अंवलबू राहण्याची गरज नाही. आता आपण लढूनच आरक्षण मिळविण्यार असल्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता गोर-गरीबांची गरज नाही. मराठ्यांबरोबर इतर समाजही आता जागा होईल. आता समाज तुमच्यावर अंवलबून राहणार नाही. मराठे आता लढायला सज्ज झाले आहेत. आता आमच्यामुळे धनगर, मुस्लिम समाज सावध होतील.