Maratha Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटल्याचीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्याची घटना घडली आहे.
शेतकऱ्यांप्रती शेतकरी पुत्रांची संवदेनशीलता हरपली काय? वडेट्टीवारांचा शिंदे-मुंडेंना सवाल
खासदार प्रतापसिंह पाटील चिखलीकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर तेलंग यांना भेटण्यासाठई अंबुलगा गावात गेले होते. त्याचवेळी अंबुलगा गावातील मराठा तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
चिखलीकरांच्या गाड्यांचा ताफा गावात येताच तुम्ही आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावांत पाय ठेवू नका, असं म्हणत मराठा आंदोलकांनी खासदार चिखलीकरांना घेरा घातला होता. या संवादादरम्यान एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी जोरदार घोषणाजीदेखील संतप्त झालेल्या मराठा तरुणांकडून देण्यात आली.
चिखलीकर यांना घेरा घातल्यानंतर मराठा तरुणांचा त्यांच्याशी संवाद सुरु असतानाच काही आंदोलकांनी चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या. यावेळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गाड्या फोडल्याच्या घटनेनंतर तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं लक्षात आल्यानंतर चिखलीकरांनी तत्काळ अंबुलगा गावातून पाय काढला.
देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत असतानाच अनेक गावात राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारल्याच्या बातम्या समोर आल्या. अशातच अंबुलगा गावातील मराठा समाजाकडून एकमताने ठराव घेत नेत्यांना प्रवेश नाकारला आहे.
Government schemes : शेळीपालन अन् कुकुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान, कोणाला मिळणार फायदा?
अंबुलगा गावात राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारल्याबाबतची माहिती चिखलीकरांना नव्हती त्यामुळेच चिखलीकर गावात आल्यानंतर मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. राज्यात सध्या मराठा आंदोलनाची धग गावागावात जाऊन पोहोचली असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आरक्षणाच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे.
आजतागायत अनेक मराठा आमदार खासदार झाले मात्र कोणत्याही राजकीय नेत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या रडारवर आता हे राजकीय नेते आले आहेत. मराठा तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आता नेत्यांच्या गावप्रवेशावर बंदी आल्याचंच दिसून येत आहे.