शेतकऱ्यांप्रती शेतकरी पुत्रांची संवदेनशीलता हरपली काय? वडेट्टीवारांचा शिंदे-मुंडेंना सवाल

  • Written By: Published:
शेतकऱ्यांप्रती शेतकरी पुत्रांची संवदेनशीलता हरपली काय? वडेट्टीवारांचा शिंदे-मुंडेंना सवाल

Vijay Wadettiwar on Dhanajay Munde : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं (Farmer) सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यातच राज्यातील सरकारी यंत्रणेनंही शेतकरी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असं आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दोन महिने उलटूनही कोणतीही मदत केली नाही. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीका केली.

‘सुप्रीम कोर्टाचं ऐकू, की स्वत: निर्णय घ्यायचा’; सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर वैतागले 

स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घेणारे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता हरपली काय असा सवाल करत चांगलचं धारेवर धरलं.

विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, जाहिरातबाजीसाठी स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणून घेण्याची शर्यत सरकारमधील मंत्र्यांमध्ये लागली आहे. दसरा मेळावा भाषणात मुख्यमंत्री ओरडून ओरडून स्वत:ला शेतकरी पुत्र असल्याचं सांगत होते. त्यांच्याआधी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ येथील आत्महत्या केलेले मनोज राठोड यांच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची घोषणा केली आणि स्वत:ला संवेदनशील शेतकरी पुत्र म्हणत जाहिरातबाजी केली. आता दोन महिने होऊन गेले, पण कुटुंबियांकडे कोणी गेले नाही, फोनवर विचारणाही केली नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

त्यांनी पुढं लिहिलं की, स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करू शकत नाहीत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलेला शब्द पूर्ण करू शकत नाहीत. मदत करायची नाहीतर करू नका, पण किमान लोकांच्या भावनांसी तरी खेळू नका, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महागाव तालुक्यातील येरद येथील शेतकरी मनोज राठोड (वय ३७) यांच्यावर बँक ऑफ बडोदाचे अडीच लाखांचे कर्ज होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राठोड यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर 18 ऑगस्ट रोजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यवतमाळ शहरात आले होते. यावेळी त्यांनी राठोड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या कुटुंबांना मदत करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. शिवाय, राठोडे यांच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचेही जाहीर केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज