Download App

Maratha Reservation : बीडनंतर आता जालना जिल्ह्यातही इंटरनेट बंद

  • Written By: Last Updated:

Jalna Internet Service Cut-जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये त्याची धग जास्त आहे. मराठवाड्यात वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली आहेत. बीडमध्ये संचारबंदी लागू करत इंटरसेवा बंद करण्यात आली आहे. आता जालना (Jalna) जिल्ह्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यात दोन दिवस इंटरसेवा सेवा (Internet Service) ठप्प राहणार आहे.

Maratha Reservation : CM शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, शरद पवारांसह अनेक नेत्यांना निमंत्रण

मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक भागात हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.

एकही निर्णय मान्य नाही… अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एअरटेल, जिओ आणि इतर मोबाईल कंपन्यांकडूनही इंटरसेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंचा इशारा
राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याचे वाटप करणार आहे. सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. सरकारने उद्याची उद्या विशेष अधिवेशन बोलवावे. मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून समितीला आयोगाचा दर्जा द्या, मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

follow us