एकही निर्णय मान्य नाही… अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha Reservation : राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
सरकारने उद्याची उद्या विशेष अधिवेशन बोलवावं. मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्विकारून समितीला आयोगाचा दर्जा द्या आणि मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
उद्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर पुन्हा पाणी बंद करणार आहे. पुढील परिणामाला सरकार जबाबदार असेल. महाराष्ट्र शांत आहे पण सरकारला महाराष्ट्र शांत राहून द्यायचा नाही असं वाटतं. बीडमधील हिंसाचार प्रकरणी निर्दोष मराठा युवकांना अटक करण्यात आली असून ही दडपशाही बंद करावी, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मोठी बातमी : राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; शिंदे सरकारचा निर्णय
बीडमधील हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी निर्दोष, गरीब मराठा युवकांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई ताबडतोब बंद करावी. बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसेल. त्यावेळी पाच लाख येतील अथवा 10 लाख आंदोलक असे तर मला त्याची काळजी नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Nitesh Rane यांचा जरांगेंना फोन; म्हणाले, आरक्षण मिळत राहिल तुम्ही…
देवेंद्र फडणवीस यांनी आयुष्यात दुसरं काय केलं? घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपायला आलंत,आमच्या पैशावर बासुंदी, गुलाबजामुन खायले, करा काय करायचे ते, तुम्ही किती ताकतवर आहेत किती 307 करायचे ते करा? असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला.
बीडचे SP जातीयवादी आहेत, तुम्ही तुमच्या लोकांना तंबी द्या. आम्ही 50 टक्के आहोत, बौद्ध, मुस्लिम, धनगर, OBC यांचा आम्हाला पाठिंबा आहे. अर्धवट निर्णय मान्य नाही, उद्यापर्यत निर्णय घ्या, असे त्यांनी म्हटले.