जालना: राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी राज्याचा दौरे काढला आहेत. जरांगे हे आक्रमक भाषा वापरून राज्यकर्त्यांना थेट इशारा देत आहे. तर मंत्री छगन (Chhagan Bhujbal) भुजबळ ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घेऊ नये, यासाठी जोरदार विरोध करत आहेत. आता काही मराठा संघटनांनी, नेत्यांनी छगन भुजबळांना निवडणुकीत पाडू अशी भाषा सुरू केली आहे. त्याला ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी जोरदार इशारा दिला आहे. तुम्ही एक भुजबळ पाडाल, तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू, असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.
श्रीराम तोंडी लावायला आणि बसायचं कॉंग्रेसच्या पंगतीला; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
प्रकाश शेंडगे म्हणाले, एकही मराठा भुजबळांना मत देणार नाही. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडू. अशी भाषा मराठा समाजातील काही नेते, संघटना करू लागल्या आहेत. या सगळ्या राज्यकर्त्यांनी इशारा देतो की, तुम्ही जर एक भुजबळ पाडणार असाल, तर आम्ही पण 160 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही. आता ओबीसींना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली असल्याचे शेंडगे म्हणाले.
जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर
भुजबळ यांचा येवले मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी केवळ मराठा मतदार नाहीत. त्याठिकाणी मराठा सोडून ओबीसी मतदार आहेत. धनगर, दलित, मुस्लिम, मुस्लिम मतदार आहेत. मराठांनी मतदान करणार नसतील तर बाकीचे मतदार आहेत ना. परंतु पाडापाडीची भाषा महाराष्ट्रातून सुरू झाली आहे. एक ओबीसी नेता छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा होत असेल, तर ओबीसी समाज 60 टक्के आहे. छगन भुजबळांना तुम्ही पाडाल, तर ओबीसी समाज १६० मराठा आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
सर्वक्ष पक्षातील ओबीसी नेत्यांना निमंत्रण
जालन्यातील अंबड येथे ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्याबाबत शेंडगे म्हणाले, या सभेसाठी काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.