Nanded Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) ‘हात’ सोडून भाजपचे (BJP) कमळ हाती घेतल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार, नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याविषयीची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली.
मुदत शिल्लक असतांनाच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. त्यानंतर काल त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळं नांदेड जिल्ह्यातील राजकारण आता ढवळून निघत आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळं कॉंग्रेसला धक्का बसला. नांदेडच्या शहर कार्यकारणीतील बहुतांश पदाधिकारी हे चव्हाण यांचे समर्थक आहेत. त्यामुळं पटोले यांनी आता स्थानिक कार्यकारणीच बरखास्त केली. नाना गावंडे यांनी एक पत्रक जारी केलं. त्यात नांदेड शहर व ग्रामीण जिल्हा विकास कमिटीच्या समन्वयपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती केली.
मुदत शिल्लक असतांनाच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा
चव्हाण यांना राज्यसभेची उमदेवारी
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काल (१३ फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देतांना चव्हाण म्हणाले की, आज राज्यसभेसाठी माझ्या नावाची घोषणा केल्याबद्दल मी भाजपचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली याचा मला आनंद आहे. माझ्यासारख्या नव्या नेत्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी या नेत्यांचा आभारी असल्याचं चव्हाण म्हणाले.