छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या दिवशी घडलेल्या दंगलीत पीएफआय संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दंगलीप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 28 जणांना अटक केली असून 50 ओळख पटली असल्याची माहिती पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे.
‘सरकार नपुंसक.. कोणीही या काहीही बोला’; बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा संताप
पीएफआयशी संबंधित एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात आली असून सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी घातली होती. तेव्हाही काही संशयितांना अटकही झाली होती. तेव्हाच संघटनेचे पुढील टार्गेट न्यायव्यवस्था व पोलिस असल्याचा इशारा एटीएसने दिला होता.
धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार
दरम्यान, पीएफआयचा इशार अखेर खरा ठरल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 29 मार्चच्या रात्री दंगलखोरांनी 14 पोलिस वाहने जाळली, तर 17 पोलिस दगडफेकीत जखमी झाले. दंगेखोरांना मदतीचा ठपका 1 अवैध आर्थिक व्यवहाराचा ठपका ठेवत 2019 मध्ये जिन्सीतील पीएफआयच्या कार्यालयावर ईडीचा छापा. त्यात राजाबाजार दंगलीतील आरोपींना कायदेशीर मदतीसाठी फंडिंग केल्याची कागदपत्रे सापडली होती.
नयनज्योती सैकिया ठरला ‘MasterChef India’चा विजेता; ट्रॉफी- रोख रक्कमेसह जिंकली प्रेक्षकांची मने
2 सप्टेंबर 2022 मध्ये तपास यंत्रणांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पहाटेच्या वेळी एकदाच छापे टाकून ‘पीएफआय’शी संबंधित 21 पदाधिकाऱ्यांना अटक केली, अनेकांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. 3 तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी संशयितांची चौकशी करून त्यांच्या घराची झडतीही घेतली होती.
Anupam Kher यांनी दाखवली ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची’ पहिली झलक
दरम्यान, एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीची पार्श्वभूमी असतानाच दुसरीकडे आज महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.