Download App

मनोज जरांगेंना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न; आंबेडकरांच्या आरोपाने एकच खळबळ

Image Credit: letsupp

Prakash Ambedkar News : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान अन्न, पाणी, उपचार न घेण्याचा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला. जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर अखेर सरकारने येत्या 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Manoj Jarange : ‘अधिवेशनात ‘सगेसोयऱ्यां’बाबत भूमिका स्पष्ट करा नाहीतर’.. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे यांच आंदोलन यशस्वी झालं तर राजकारणात भयंकर उलथापालथ होईल, हे लक्षात घेता तसं होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मनोज जरांगे यांना मेडिकल, ओषधे, जेवण, पाणी, ज्यूस, दिलं जात आहे. त्याची तपासणी केली पाहिजे, अशी मागणीच प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली आहे. तसेच देशात मागील 40 वर्षांत बरेच जण अपघातात अचानकपणे मयत झाली असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘भाजपकडून ऑपरेशन लोट्स सुरु’ विश्वासदर्शक ठराव जिंकत केजरीवालांचा प्रहार

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. या नऊ दिवसांच्या काळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. या अहवाल चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. या अधिवेशनात जर सरकारने सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

youtube.com/watch?v=SZWfkFrAIUo

जरांगे म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. त्यामुळे आपल्या आंदोलनामुळे एकाही विद्यार्थ्याला अडचण होता कामा नये. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करुन मोठा आदर्श घालून दिला आहे. आता आपल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना कोणताही अडचण होणार नाही याची काळजी घ्या. सरकारने सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत झाली पाहिजे यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला त्याबद्दल मराठा समाज आनंद व्यक्त करणारच आहे.

follow us

वेब स्टोरीज