‘भाजपकडून ऑपरेशन लोट्स सुरु’ विश्वासदर्शक ठराव जिंकत केजरीवालांचा प्रहार
CM Arvind Kejriwal : दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी विश्वासदर्शक ठराव एकमताने जिंकला आहे. दिल्ली विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. त्यानंतर सभागृहात आवाजवी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
अजितदादांची जहरी टीका : पण आता त्यांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई स्वीकारणार संसद महारत्न पुरस्कार
दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आल्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यानंतर एकूण 62 पैकी आम आदमी पक्षाचे 54 आमदार उपस्थित होते. या ठरावावर आम आदमी पक्षाला 54 मते मिळाल्यानंतर बहुमत मिळवलं आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाविरोधात एकच मत पडलं आहे.
काँग्रेसला दिलासा ! गोठवलेले बॅंक खाते पुन्हा सुरु, ITAT ने दिला आदेश
आम आदमी पक्षाकडून सातत्याने भाजपवर आरोप करण्याचे सत्र सुरु आहे. सेवा विभाग आणि नोकरशाहीवर नियंत्रण ठेऊन भाजप सरकारच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्याकडून केला जात असून आमदार फोडण्यासाठीच भाजपकडून ऑपरेशन लोट्स चालवण्यात येत असल्याचंही केजरीवालांनी म्हटलं आहे.
Electoral Bonds Scheme : इलेक्टोरल बॉण्ड नक्की काय? कधी आणि का सुरू करण्यात आले होते?
विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत चर्चा सुरु असतानाच अरविंद केजरीवाल म्हणाले, पुढील निवडणुकीत तुम्हाला दिल्ली विधानसभा रद्द करायचीयं असं सांगून मतं मागण्यासाठी जा, त्यांनी जर विधानसभा रद्द केली तर मी तुमच्यासाठी काम करत राहणार आहे. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली विधानसभा रद्द करणार असल्याचा थेट आरोप अरविंद केजरीवालांनी केला आहे.
अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही कोणासोबत….’
आम आदमी पक्षामुळेच भाजपला भविष्यात भीती वाटत आहे. भाजपला आम आदमी पक्ष फोडायचा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हरला नाही तर आम आदमी पक्षच 2029 पर्यंत देशाला भाजपमुक्त करणार असल्याचा विश्वासही केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच देशात भाजप आणि काँग्रेसनंतर आप तिसरा सर्वात मोठा बनला असल्याचंही ते म्हणाले आहेत.