Download App

‘ओबीसीतून एक टक्काही आरक्षण देणार नाही, वाकड्या नजरेनं पाहाल तर…; प्रकाश शेंडगेंचा इशारा

  • Written By: Last Updated:

Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळं जरांगेच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. जरांगेच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला असून ओबीसी नेत्यांनी राज्यभरात सभा घेण्यास सुरुवात केली. आज हिंगोली येथील सभेतून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी जरांगेच्या मागणीवरून सरकारला इशारा दिला. ओबीसीतून एक टक्काही आरक्षण देणार नाही, वाकड्या नजरेनं पाहाला तर सरकार उलथवून टाकू, असं शेंडगे म्हणाले.

“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन 

मराठवाड्यातल्या हिंगोली येथे आज ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ,
रामदास तडस, लक्ष्मण गायकवाड यासारखे अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करतांना प्रकाश शेंडगे म्हणाले की, आज संविधान दिन आहे. मात्र, ओबीसी समाजातील अनेक वंचित घटकांना संविधान काय असतं, काय असतं स्वातंत्र्य? हेच माहिती नाही. स्वातंत्र्य ओबीसींच्या दारापर्यंत आलंच नाही… आता संविधानाने ओबीसीने दिलेले हक्क, आरक्षण मराठा समाज हिसकाऊ पहात आहे. पंचाहत्त्तर वर्षात तुमच्या हातात सत्ता दिली, तरी तुमचं पोट भरलं नाही. बॅकलॉक भरला नाही, असं सांगत मराठा बांधव ओबीसींच्या ताटातला घास बळकाऊ पाहत असल्याची टीका केली शेंडगे यांनी केली.

Reshma Shinde : केसात गजरा, निरागस हास्य आणि दिलकश अदा… रेश्माचा गोड लूक 

सरकार उलथवून टाकू- शेंडगे
शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसींनी गरीब केलं नाही. तुमचं मागासलेपण सगळ्यांनी नाकारलं आहे, मराठा समाज मागास नाही, हे सुप्रिम कोर्टाने मान्य केलं. त्याची शिक्षा तुम्ही ओबीसींना का देताय? मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय, आज ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय, मात्र, ओबीसीतून एक टक्काही आरक्षण देणार नाही, वाकड्या नजरेनं पाहाला तर सरकार उलथवून टाकू, असं शेंडगे म्हणाले.

ईडीब्यूएसचं आरक्षण मराठा समाजाला
आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. मराठा समाजाचे आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, तेव्हा आम्ही पाठिंबा दिला. निगाले. तेव्हा म्हणायचे, आम्हाला कुणाचं आरक्षण हिसकायचं नाही. आणि आज मराठा समाज ओबीसीतू आरक्षण मागतोय. आता मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय, त्याला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा सदैव विरोध राहील. मात्र, ईडीब्यूएसचं आरक्षण मराठा समाजाला आहे. मात्र, याचं पोटचं भरत नाही, असं शेंडगे म्हणाले

आता आरक्षणाच्या लढाईसाठी मुस्मिम, दलितांनाही ओबीसींसोबत यावं. आपण येत्या निवडणुकीत मराठ्यांचे 160 चं काय, त्यांचा सुफडा साफ करू. भुजबळांना मराठा समाज टार्गेट करत आहे. मात्र, मराठ्यांनी भुजबळांचा नाद करायचा नाही. त्यांचा 440 व्होल्टेजचा करंट आहे. तुम्हाला सोसायचा नाही, असंही शेंडगे म्हणाले.

भुजबळ साहेब, तुम्ही आदेश करा, राज्यात सत्ताबदल करू. मराठ्यांना मतदान करायचं नाही. ओबीसींनी मत दिल्यानं हे आमदार होतात आणि नंतर ओबीसींमधून आरक्षण मागतात. आता ओबीसीमधून लोकप्रतिनिधी देणार, असंही शेंडगेंनी ठणकावलं.

 

 

Tags

follow us