Ambadas Danve on Walmik Karad : मंत्री धनंजय मुंडे यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत. वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्याने यात लक्ष दिलं. मालमत्ता हस्तांतरीत केल्या असा खळबळजक गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला. अंबादास दानवे आज एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वाल्मिक कराडबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
वाल्मिक कराडच्या मदतीसाठी पोलिसांकडून बनावट अटक; आमदार सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट
धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत सत्ताधारी पक्षाचे पुरावे मागत आहेत. सरकार निर्लज्जपणे त्यांना सरकारमध्ये ठेवत आहे. अनेक जण मुंडे याची बाजू घेत आहेत. मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. सरकारला अजून कुठले पुरावे पाहिजे आहेत. विरोधी पक्षांनी याबाबत आवाज उठवला आहे. बीडची पोलिस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. कोणी मुक्तपणे काम करत नाही. अधिकारी पण बीडला काम करत नाही. त्यांचेच बगलबच्चे काम करत आहेत हे स्पष्ट झालेले आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर बोलताना दानवे म्हणाले, याबाबत मला माहिती नाही. मी झिशान सिद्दीकींना भेटलो होतो. तेव्हा ते म्हणाले होते तपास चुकीच्या पद्धतीने होत आहे. जर हे खरं असेल तर बिल्डर कोण होता तो राजकीय नेता कोण होता हे तपासणी पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी ते काम केलं पाहिजे असे आमदार अंबादास दानवे यावेळी म्हणाले.
एसटी बस दरवाढीवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एसटीच्या काचा नीट नाहीत. सीट व्यवस्थित नाहीत. खासगीकरणाला वाव द्यायचा आहे का? तोटा सहन केला पाहिजे. आज दरवाढीच्या मुद्द्यावरच राज्यात आंदोलन होत आहे. एसटी महामंडळ गलथानपणा, बेशिस्तपणा यांमुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. खाजगी व्यवस्था सुरू करतो आहोत असं आता सरकारने जाहीरपणे सांगून टाकावं असा टोला अंबादासन दानवे यांनी लगावला.