काही दिवसात वाल्मीक कराड राजकारणात येतील अन् भाजपच्या गटात… राऊतांचं खबळजनक विधान

  • Written By: Published:
काही दिवसात वाल्मीक कराड राजकारणात येतील अन् भाजपच्या गटात… राऊतांचं खबळजनक विधान

Sanjay Raut on Walmik Karad : संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत भाजपवर जोरदार निशाणा साधत असतात. (Sanjay Raut) अशातच आता राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसंच, सरकारचा पाठिंबा असल्याने आमदार सुरेश धस बोलत आहेत असा टोलाही त्यांनी लागवला आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत आज कोणताच फैसला होणार नाही. वाल्मिक कराडसाठी रुग्णालयाचा एक मजला रिकामा केला. हे सर्व धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अजित पवार यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येऊन ते भाजपाच्याच गटात बसतील, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

फरार असताना वाल्मिक कराडने मालमत्ता ट्रान्सफर केल्या; दानवेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

पुढे ते म्हणाले की, ‘न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. न्यायमूर्ती चंद्रचूड फक्त मैदानावर खेळत राहिले. चेंडू रगडत राहिले. पण त्यांनी विकेट घेतली नाही. आपल्या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही, असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. वाल्मिक कराड याच्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कराड खरोखरच राजकारणात एंट्री करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

आम्हाला आमदार अपात्रतेबद्दल निकाल अपेक्षित होता. संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल असं वाटत होत. ज्या आमदारांनी पक्षांतर केलं ते अपात्र ठरतील, बेकायदेशीर घटना बाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल असं वाटत होत पण अपेक्षा या देशांमध्ये न्यायाबाबती ठेवता येत नाहीत असा थेट वार संजय राऊत यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube