Download App

‘लबाडांनो पाणी द्या’ संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा; खरे लबाड ठाकरेच, भाजपकडून जोरदार टीका

Thackeray group vs BJP : शिवसेना ठाकरे गटाचा “लबाडांनो पाणी द्या” या शीर्षकाखाली आज शहरात मोर्चा आहे. यासाठी युवा सेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. (BJP) दरम्यान, भाजपने या मोर्चावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट सोंग करीत असून मोर्चाचे ढोंग करीत आहे. मनपात सत्तेत असताना सर्वाधिक महापौर त्यांचे राहिले. त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याचे वाटोळे होण्यासह अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला असा थेट आरोप करत मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी जोरदार टीका केली.

Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत ;नरकातला स्वर्ग का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत

माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मनपा एकहाती चालवली. भाजपने त्यांच्या धोरणाला वारंवार विरोध केला. खरे लबाड ठाकरे व त्यांचा गट आहे. त्यांच्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे दोन ते अडीच वर्षे नुकसान झाले. पाणीपुरवठा योजना त्यांच्या महापौरांच्या कार्यकाळात आल्या, आणि त्यांच्याच कार्यकाळात बंद पडल्या. त्यामुळे हे शहर आजही पाणीपुरवठ्यापासून वंचित असल्याची टीका सावे यांनी केली.

आगामी काळामध्ये या शहरात मोठे मोठे उद्योग येणार आहेत. उद्योगांना लागणारे पाणी देण्यासाठी नवीन योजनेचे काम लवकर पूर्ण करून शहराला रोज पाणी देणे हेच भाजपचे लक्ष्य आहे. ठाकरे सरकारच्या काळामध्ये अडीच वर्षे योजनेची संचिका मातोश्री आणि त्या वेळी असलेले पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे कितीदा गेली याचा पूर्ण रेकॉर्ड आजही मंत्रालयात आहे. योजनेची कोट्यावधी रुपये किंमत वाढण्याची कारणे त्या संचिकेत दडलेली आहेत असंही सावे म्हणाले.

खैरेंची २० वर्षे मनपात लुडबूड

२० वर्षे खैरेंनी मनपात लुडबूड केली. प्रत्येक योजनेची विषयपत्रिका त्यांच्याकडे गेल्याविना मंजूर होत नव्हती. सर्वाधिक महापौर त्यांच्या पक्षाचे राहिले. मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे योजनेला मंजुरी न दिल्यामुळे किंमत वाढली. सरकार बदलल्यावर योजनेला गती मिळाली असा दावा डॉ. भागवत कराड यांनी केला. खासदार

follow us