Download App

मोठी बातमी! जालन्यात राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना अटक, एटीएसची कारवाई…

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

  • Written By: Last Updated:

ATS Action on Bangladeshi: भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी रात्री ७ते १०.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. हुमायून कबीर अली अहमद, माणिक खान जन्नोदीन खान, इमदाद हुसेन मोहंमद ऊली अहमद अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे शिमगा…, गुणरत्न सदावर्तेंची टीका 

आन्वा या ठिकाणी काही बांगलादेशी बेकायदेशीररित्या राहत असल्याची गुप्त माहिती पारथ पोलिसांना मिळाली होती. एटीएसने पोलिसांच्या मदतीने गुप्त कारवाई करत या तीन बांगलादेशींना अटक केली. आन्वा येथे ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला पथकाने या तिघांच्या शोधासाठी जळगाव गाठले होते. नंतर त्यांना हे तिघे भोकरदन तालुक्यात असल्याचे समजले.

आमदार धसांना सुशांत शेलारांनीही सोडलं नाही, म्हणाले, वाचाळवीरांमुळे..,

पारध पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाला मदत केली. याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. भोकरदन तालुक्यातील आन्वा आणि कुंभारी येथील स्टोन क्रशरवर ते काम करत होते. ते कामानिमित्त कधी आन्वा तर कधी कुंभारी येथे राहत असत. ताब्यात घेण्यात आलेल्या या बांगलादेशी तरुणांची पोलिसांनी झाडाझडती केली असता वैध प्रवासी कागदपत्राशिवाय आणि अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरी करून भारतात आले असल्याचे त्यांच्या चौकशीत पुढे आले.

दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर येथील टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली. अटक केलेले तिघेही बांगलादेशी असून अवैधपणे राहत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती.

 

follow us