Download App

बसवराज तेली आष्टीचे जावई, माझ्या पतीला अडकविण्यासाठी धसांची प्लॅनिंग’ कराडच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

Manjali Karad Allegation On Suresh Dhas: एसआयटीचे बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांचे आणि धस हे एकमेंकाच्या संपर्कात.

  • Written By: Last Updated:

Manjali Karad Allegation On Suresh Dhas : पवनचक्की कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना मोक्का लावण्यात आलाय. त्यानंतर परळीमधील वातावरण तणावपूर्ण झालेय. कराड यांचे समर्थक हे आक्रमक झाले आहेत. त्यात आता वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड (Manjali Karad)यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एसआयटीचे प्रमुख आयपीएस अधिकारी बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांचे आणि धस हे एकमेंकाच्या संपर्कात आहे. दोघांचे सीडीआर काढून ते तपासावे, अशी मागणीच मंजली कराड यांनी केलीय.

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया 

एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. मूळच्या आष्टीच्या असलेल्या आयएएस अधिकारी शितल उगले यांचे ते पती आहेत. यांनी एसआयटीचे प्रमुख म्हणून जावईचे आणून बसविले आहेत. शितल उगले यांचे मामा जिल्हाधिकारी होते. त्यांचे आजोबा हे आष्टीमध्ये तहसील क्लार्क होते. त्यातून धसांची येथे मनमानी चालू असल्याचे दिसून येत आहे. धसांनी आपल्या सोईनुसार येथे त्यांचे माणसे आणून बसविले असल्याचा आरोप मंजली कराड यांनी केलाय.

एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सुरेश धस हे पंधरा दिवसांपासून एकमेंकाच्या संपर्कात आहेत. तुम्हाला सीडीआर काढण्याची खूप हौस आहे तर या दोघांचे काढावेत. ते माझ्या पतीला अडकविण्यासाठी प्लॅनिंग करतायत, असा आरोप मंजली कराड यांनी केलीय. एसआयटीचे तपासी अधिकारी बसवराज तेली आणि इतर आठ लोकांना एसआयटीमधून काढून टाकावे. कुणाचे नातेवाईक नसलेले, जवळचे नसलेले अधिकाऱ्यांची एसआयटीमधून नियुक्ती करावी, अशी मागणी कराड यांनी केलीय.


दोन मंत्री आणि माझ्या पतीला संपविण्याचा धसांचा डाव

फक्त वंजारी समाजाची माती करायची आहे, दोन्ही मंत्री नको आहेत. जे चाळीस वर्षात घडलेले नाही. ते आता घडले आहे. त्यामुळे हे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्या लोकांना कमी करण्यासाठी माझ्या माझ्या पतीला टार्गेट करण्यात आले आहे. सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केली आहे. सुरेश धस यांना मंत्री, पालकमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी दोन मंत्र्यांना संपविण्यासाठी आणि माझ्या पतीला संपविण्यासाठी हे सुरु आहे. जातीय समीकरण जोडून माझ्या पतीला बळीचा बकरा बनविला आहे.

follow us