वंजारी समाजाचे दोन मंत्री डोळ्यात खुपतायत, म्हणून हा डाव; वाल्मिक कराडच्या पत्नीचा धस, सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप

  • Written By: Published:
वंजारी समाजाचे दोन मंत्री डोळ्यात खुपतायत, म्हणून हा डाव; वाल्मिक कराडच्या पत्नीचा धस, सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप

Manjali Karad Allegation On Suresh Dhas And Bajrang Sonwane: पवनचक्की कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना मोक्का लावण्यात आला आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात त्यांना आरोपी केले जाऊ शकते. त्यामुळे परळीतील त्यांचे समर्थक हे आक्रमक झाले आहे. परळीत बंद पुकारण्यात आला आहे. त्यानंतर वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या पत्नी मंजली कराड यांनी पत्रकारांशी बोलताना आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि
खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वंजारी समाजाचे दोन मंत्री झाले आहेत. ते मराठा समाजाच्या डोळ्यात खुपायला लागले आहेत. त्यामुळे दोन मंत्र्यांना संपविण्यासाठी, तुमच्या राजकारण्यासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेतला जात आहे, असा गंभीर आरोप मंजली कराड (Manjali Karad) यांनी केलाय.

वडगावशेरीतील दफनभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन संपन्न, आमदार बापूसाहेब पठारे यांची उपस्थिती

मंजिली कराड म्हणाल्या, हत्येचा घटना घडली तेव्हा माझे पती हे परळी किंवा बीड शहरात हजरच नव्हते. ते बाहेरगावी देववाला होते. या खुनाशी माझ्या पतीचा काही संबंध नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या विभागाला वंजारी समाजाचे दोन मंत्री दिले गेले. हा विषय मराठा समाजाला खुपायला लागला. कमी लोकसंख्येच्या लोकांचे दोन-दोन मंत्री करण्यात आले. ते विषय डोळ्यामध्ये खुपत आहे. सुरेश धसांचे स्टेटमेंट आहे, तुमचे माती करेल म्हणून. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी दिल्यानंतर माझे पती हे त्यांच्याशी बोलले आहे. हा विषय त्यांनी सोडून दिला. जेव्हा अंजली दमानिया यांनी एसआयटीच्या अधिकाऱ्यांचे माझ्या पतीबरोबरचे फोटो सादर केले. माझे पतीचे एसआयटीमधील काही जण नातेवाइक असल्याचे दमानिया यांनी सांगितले. या लोकांना एसआयटीमधून काढावे, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. आता काय प्रकार केला जात आहे.

मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप

एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. मूळच्या आष्टीच्या असलेल्या आयएएस अधिकारी शितल उगले यांचे ते पती आहेत. यांनी एसआयटीचे प्रमुख म्हणून जावईचे आणून बसविले आहेत. ते शितल उगले यांचे मामा जिल्हाधिकारी होते. त्यांचे आजोबा हे आष्टीमध्ये तहसील क्लार्क होते. त्यातून धसांची येथे मनमानी चालू असल्याचे दिसून येत आहे. धसांनी आपल्या सोईनुसार येथे त्यांचे माणसे आणून बसविले असल्याचा गंभीर आरोप मंजली कराड यांनी केलाय.

दोन मंत्री आणि माझ्या पतीला संपविण्याचा धसांचा डाव

फक्त वंजारी समाजाची माती करायची आहे, दोन्ही मंत्री नको आहेत. जे चाळीस वर्षात घडलेले नाही. ते आता घडले आहे. त्यामुळे हे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्या लोकांना कमी करण्यासाठी माझ्या पतीला टार्गेट करण्यात आले आहे. सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केली आहे. सुरेश धस यांना मंत्री, पालकमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी दोन मंत्र्यांना संपविण्यासाठी आणि माझ्या पतीला संपविण्यासाठी हे सुरु आहे. जातीय समीकरण जोडून माझ्या पतीला बळीचा बकरा बनविला आहे. दमानिया यांचे एेकूण एसआयटीची टीम बदलली आहे. तशी माझी मागणी आहे बसवराज तेली यांची बदली झाली पाहिजे, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहे. तसेच एसआयटीमधील सर्व आठही लोक बदलावेत, अशी मागणी मंजली कराड यांनी केली आहे. सीआयडी आणि एसआयटी खोटे पुरावे तयार करून माझ्या पतीला बळीचा बकरा बनू शकतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांची उद्याच्या उद्या बदली केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. या अधिकाऱ्यांची बदली न केल्यास उद्या चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही मंजली कराड यांनी केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube