धनुभाऊंसाठी शेलारांची बॅटिंग; तर विरोधी नेतेपदासाठी थोरात, चव्हाण अन् वडेट्टीवारांकडून प्रश्नांची सरबत्ती

Maharashtra Monsoon Assembly Session 2023  : राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पहायला मिळाले. राज्यामध्ये बियाणांच्या खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची चर्चा सभागृहात चालू होती. या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी मुंडेंना धारेवर धरले. धनंजय मुंडेंनी या प्रश्नाला उत्तर देताना […]

Letsupp Image   2023 07 19T124425.723

Letsupp Image 2023 07 19T124425.723

Maharashtra Monsoon Assembly Session 2023  : राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पहायला मिळाले. राज्यामध्ये बियाणांच्या खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची चर्चा सभागृहात चालू होती. या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी मुंडेंना धारेवर धरले.

धनंजय मुंडेंनी या प्रश्नाला उत्तर देताना बोगस बियाणांच्या वर जसा बिटी कॉटनचा कायदा आहे, तसाच कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी समिती गठित केली असून त्या समितीमध्ये कृषीमंत्री, महसूल मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, ग्रामविकास मंत्री यांचा समावेश आहे. या अधिवेशनातच बोगस बियाणांच्या संदर्भातील कायदा आणला जाईल, असे धनंजय मुडेंनी सांगितले.

साधे दुचाकीचोर म्हणून पकडलेले निघाले ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी; पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

मुंडेंच्या या उत्तरानंतरही काँग्रेस नेत्यांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरुच होती. त्याला उत्तर देण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार उभे राहिले. शेलार म्हणाले की, ” राज्यामध्ये बियाणांच्या खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याची चर्चा सभागृहात सुरु होती. मी बघोतय समोर त्याठिकाणी वरिष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमतीताई, अशोक चव्हाण हे सर्व जण मंत्री महोदय उत्तर देत असताना मध्येच उठून ओरडत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचा प्रश्न आधी निपटवा. हे सर्व जण शांत बसतील. त्यासाठी हे सगळं सुरु आहे.”

Shinde VS Thackery : राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? ठाकरे-शिंदेंची धाकधूक वाढली; दोन्ही गटांकडून नोटीसला उत्तर

शेलारांच्या या उत्तरावर काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले. अशोक चव्हाण यांनी याला उत्तर देताना, सभागृहामध्ये मंत्री महोदय उपस्थित असताना आशिष शेलारांना त्यांची वकिली करण्याचे काहीच कारण नाही, असे म्हणत शेलारांना टोला लगावला. केंद्राने खतावर सबसिडी दिल्यानंतर राज्यामध्ये त्याचे भाव कमी होतात का हा मुळ प्रश्न आहे. व्यापारी त्यात लूटमार करताय का असाही प्रश्न आहे, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर किती गुन्हे दाखल झाले, असे प्रश्न अशोक चव्हाणांनी उपस्थित केले.

Exit mobile version