साधे दुचाकीचोर म्हणून पकडलेले निघाले ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी; पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

साधे दुचाकीचोर म्हणून पकडलेले निघाले ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी; पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

Pune Crime : देशविघातक कृत्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी काल दोघा जणांना कोथरूड परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसे पाहिले तर हे तिघेजण दुचाकी चोरताना पोलिसांच्या तावडीत सापडले. पण पोलिसांनी जसजसा चौकशीचा फास आवळला तसतसे धक्कादायक खुलासे होत गेले. पोलिसांनी पकडलेले हे दुचाकीचोर चक्क मोस्ट वॉन्टेड आणि एनाआयएच्या रडारवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी कर्तव्य तत्परता दाखवत इतक्या मोठ्या गुन्हेगारांना जेरबंद केल्याने त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हे संशयित दुचाकी चोरत होते त्यावेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्याच्या कामात पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि पोलीस अंमलदार अमोल नजन यांनी आपले कामगिरी चोख पार पाडली.

https://letsupp.com/pune/pune-crime-brother-in-law-knocked-out-four-teeth-68630.html

पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे दोघे जण राजस्थानमध्ये मोस्ट वाँटेड असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ते देशविघातक कृत्यात गुंतलेले असून एनआयएचे पाच लाखांचे बक्षीसही त्यांच्यावर आहे. साधे दुचाकी चोर इतके मोठे गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांना पकडण्यात कोथरूड पोलीस ठाण्यातील प्रदीप चव्हाण आणि पोलीस अंमलदार अमोल नजन यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोहमद युनुस साकी व इम्रान खान अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलिस स्टेशन बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस अमलदार अमोल नझन गस्तीवर होते. गस्त घालत असताना त्यांना तिघे जण दुचाकी चोरताना आढळले. त्यानंतर या दोघांनी त्यांना पाठलाग करत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला साध्या दुचाकी चोरीच्या वाटत असलेल्या या गुन्ह्यात नंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले.

असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात

पुणे पोलिसांकडून सध्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांनी दुचाकी चोरीच्या संशयातून हटकले. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. कर्मचाऱ्यांनी लागलीच मदत बोलवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्या दरम्यान त्यांच्याकडे एक लॅपटॉप, चार मोबाइल तसेच बनावट आधारकार्ड मिळाले.

पुढे त्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. या दरम्यान चौकशीत काही संशयास्पद आढळून आले. त्यामुळे लागलीच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी धाव घेतली. तर पुणे एटीएसला माहिती देण्यात आली. दिवसभर या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाइल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर NIA आणि इतर यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान चितोडगड याठिकाणी NIA एक कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे फरार आहेत. NIA कडून या आरोपीवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube