Download App

‘राज्यातील मदरसे शैक्षणिक संस्था आहेत की अतिरेक्यांचे अड्डे…’; मंत्री नितेश राणेंचा सवाल

राज्यातील मदरसे हे शैक्षणिक संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत, असा सवालमंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे सतत वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. आताही त्यांनी मदरशांच्या संदर्भात एक मोठं विधान केलं. राज्यातील मदरसे हे शैक्षणिक संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत, असा सवाल राणेंनी केला. तसेच महाराष्ट्रातील मदरशांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केला.

अखेर राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार 

तालिबान जे काही मोठं झालं, ते मोठं करणारे या मदराशांमध्ये तर जन्माला येत नाहीयेत ना, असा सवालही नितेश राणेंनी यांनी केला.

राणे म्हणाले की, खरंच सर्वधर्म समभाव आहे, तर काही वर्षापूर्वी एक हिंदू शिक्षक मदरशांमध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरायला आला म्हणून त्याला चाकून भोसकले जाते. त्याच्यावर हल्ला केला जातो. या मुद्दावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या मदरशाच्या निमित्ताने एक यमनचा अतिरेकी विचाराचा नागरिक सापडला आहे. तसाच विशालगडावरील मदरश्यांमध्ये अतिरेकी तिथून राहून गेले आहेत. देशाविरुद्धच्या कारवाईत सहभागी असलेला अतिरेकी तिथं सापडला होता, असं राणे म्हणाले.

रेवडी संस्कृतीवरून SCने सरकारला फटकारले, ‘मोफत योजनांमुळे लोक काम करेनात’ 

ते पुढं म्हणाले की, हे मदरसे म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे तर नाहीत ना, ज्यात अतिरेक्यांना मोठं केलं जातं. या मदरशांचा वापर देशविरोधी ताकदींना देशाविरोधात वापरण्यासाठी वापर केला जातो. मदरशांमध्ये नेमकं काय होतं? याची चौकशी करण्यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. हे शिक्षण देण्यासाठी आहे की, अतिरेक्यांना दूध पाजून मोठं करण्यासाठी आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मदरशा जर अतिरेक्यांना पोसले जात असेल तर हे मदरसे आम्हाला हवेत कशाला? आता नंदुरबारमधील एका मदरशात यमनचा नागरिक सापडतो, हा केवढा मोठा धोका आहे. अतिरेक्यांचे अड्डे जर मदशात सुरू असतील तर बंद करण्यात यावे, यासाठी मी स्वत: पाठपुरावा करणार आहे. तिथं अतिरेकी येऊन राहता कामा नये. तसेच महाराष्ट्र सरकार म्हणून भूमिका घ्यावी, असं पत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं असल्याचं राणे म्हणाले.

देशात शरिया कायदा लागू झाला आहे का?
राणे म्हणाले की, देशभरात शिक्षणासाठी वेगळा नियम आहे. सर्व शाळांना रविवारी सुट्टी दिली जाते, तर मदरशांमध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाते. देशात शरिया कायदा लागू झाला आहे का?, असा सवालही राणेंनी केला. चार मुलं घडवली जावी म्हणून अनुदान दिलं जातं, पण जर तिथं कसाब घडवले जाणार असतील तर अनुदान द्यायचे का, असा सवालही राणेंनी केला.

follow us