Minister Pratap Sirnaik tell about Parking policy car can registered if there is a parking space : राज्यामध्ये ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढ हा चिंतेचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनांची संख्या वाढणे ही देखील दिवसेंदिवस गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यावर राज्यसरकारकडून उपाययोजना करण्यासाठी लवकरच राज्यात पार्किंग पॉलिसी आणली जाणार आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहितीा दिली.
पोलीस कर्मचाऱ्याची तीन लाखांची मागणी, भाजप आमदार चव्हाण भडकले, पोलीस ठाण्यात पोहचले अन्…
यावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, लवकरच राज्यात पार्किंग पॉलिसी येणार आहे. या पार्किंग पॉलिसी विषयी आज सोमवारी दिनांक 19 मे रोजी बैठक झाली. यामध्ये एमएम रिजनमध्ये पार्किंग पॉलिसी कशी राबवता येईल? याच्यावर आम्ही चर्चा केली. कारण एमएमआर रिजनमध्ये पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे. एमएमआर रिजनमध्ये काही धोरण अखायला पाहिजे. जर पार्किंगची जागा असेल तरच गाडी रजिस्टर करता येईल ही भूमिका परिवान खात्याची आहे.
भारतातील पहिला हेल्थकेअर ब्रँड मॅस्कॉट; सोशल मीडियावर AK अन् VK ची धमाल
दरम्यान प्रत्येक देशामध्ये पार्किंग पॉलिसी आहे. फक्त आपल्या देशामध्ये नाही. त्यामुळे याची सुरुवात एमएमआर रिजनमध्ये करण्याचे धोरण आखत आहोत. ही पार्किंग पॉलिसी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी केली जाईल. असंही यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी परिवहन विभागातील बदल्यांची माहिती दिली.
त्यामध्ये ते म्हणाले की, मी ऑनलाईन बटन दाबून बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. प्रेग्नेंट महिला आहे त्या महिलांसाठी आम्ही सकारात्मक भूमिकेत आहोत. त्यामुळे त्यांच्या बदल्यांमध्ये काही अडचण असेल तर ते मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहेत. पोड टॅक्सीसाठी आम्ही एमएमआर रिजनसाठी आग्रही आहोत.याचं स्वरूप देखील आम्ही मांडलं आहे. नितीन गडकरी यांना देखील भेटलो अहो त्याने देखील हिरवा झेंडा दिला आहे.