भारतातील पहिला हेल्थकेअर ब्रँड मॅस्कॉट; सोशल मीडियावर AK अन् VK ची धमाल

India’s first healthcare brand mascot; Social media buzz with Anil Kapoor and Satyajeet Padhye : शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजीत रामदास पाध्ये यांनी भारताचा पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट — विचार कर अर्थात VK हा सह्याद्री हॉस्पिटल्ससाठी तयार केला आहे. हा पुणेरी कॅरॅक्टर त्याच्या खास मिश्कील आणि तडफदार शैलीतून लोकांचे मनोरंजन करतो. सध्या सोशल मिडीयावर सत्यजीत रामदास पाध्ये याच्या पुणेरी कॅरॅक्टर VK ने लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर सोशल मिडीयावर AK आणि VK जोडीची धमाल पाहायला मिळत आहे.
या प्रवासात VK सोबत आहेत आपले लाडके अभिनेते अनिल कपूर अर्थात (AK)! “The AKVK Show” मधून AK आणि त्याचा हुशार व पुणेरी शैलीत बोलणारा मित्र VK विविध विषयांवर चर्चा करून प्रेक्षकांना माहिती देतात, तेही विनोद आणि सहज संवादातून! या खास सिरीजमध्ये सत्यजीत आणि त्यांची टीम — कौस्तुभ आणि कैलाश यांनी अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत ८ विशेष व्हिडिओंचे शूटिंग केले आहे. AK आणि VK यांच्यातील धमाल गप्पांची केमिस्ट्री बघायला प्रेक्षकांना आवडत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
घरातच निघाले बेईमान: पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्या ८ जणांना अटक; वाचा, प्रत्येकाची A टू Z कहाणी
याबद्दल स्वतः शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजीत रामदास पाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, या मालिकेमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे 8 व्हिडीओज आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी सत्यजीत पाध्ये यांनी अभिनेते अनिल कपूर यांचे तसेच सह्याद्री हॉस्पिटलचे आभार मानले आहेत. तसेच प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले आहे.