मी ब्राह्मण असल्याने मला पुणे काँग्रेसमध्ये त्रास; ‘या’ व्यक्तीचं घेतलं नाव, संगीता तिवारींचा गंभीर आरोप

मी ब्राह्मण असल्याने मला पुणे काँग्रेसमध्ये त्रास; ‘या’ व्यक्तीचं घेतलं नाव, संगीता तिवारींचा गंभीर आरोप

Pune Congress : काँग्रेसमध्ये मी ब्राह्मण असल्याने मला त्रास देण्यात आला. माझ्यावर ब्राह्मण असल्याने ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा कट कारस्थान देखील करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप संगीता तिवारी यांनी केला आहे.यावेळी त्यांनी काही नावं घेतल्याने पुण्यातील काँग्रेसमध्ये (Congress) नक्की काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वीचं माजी आमदार रविंद्र धंगेकर, संग्राम थोपटे यांनी पक्षाला रामराम केलेला आहे. त्यातच आता हे प्रकरण समोर आलं आहे.

मला पुणे शहराचं प्रभारी महिला शहराध्यक्ष पद देण्यात आले. मात्र, हे शहर अध्यक्षपद दिल्यानंतर जे महिला अध्यक्षासाठी कार्यालय होते ते माझ्याकडून काढून घेण्यात आलं. हे कार्यालय दुसऱ्या सेलच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आलं. हे कार्यालय काढून घेतल्यानंतर मी रागात येऊन कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करेन या दृष्टिकोनातून कटकारस्थान रचून असं केल्यास माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा देखील कट पुणे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून रचला गेला, असा थेट आरोपच तिवारी यांनी केला आहे.

Video : मोदीजी मला एक आत्मघातकी बॉम्ब द्या, मी पाकिस्तानात जाऊन..काँग्रेस मंत्र्यांच मोठं विधान

नेता असो किंवा कार्यकर्ता खास करून महिला पदाधिकारी किंवा महिला कार्यकर्ता, ह्यांची आपल्याच पक्षात घुसमट होत असेल, अंतर्गत जाणून-बुजून जर त्यांना त्रास देण्यात येत असेल तर वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत. एखाद्या पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरजच नसेल, संघटनेची पण गरज नसेल तर निश्चितच वेगळा विचार करायला लागतो. मग त्याला गद्दारी, धोका एहसान फरामोश असं काही म्हणा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कुठंतरी सहनशक्ती संपते हो. खासकरून महिला खूप सहन करतात. शेवटी पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता त्याची जर किंमतच पक्ष करत नसेल तर त्या व्यक्तीने स्वतः विचार करून एक वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे. अशावेळी जिथे काम करायला संधी आहे, तुमच्या कामाची किंमत आहे , असा पक्ष निवडून निर्णय घेणं गरजेचे असत. मग तो गद्दार, धोकेबाज, एहसान फरामोश म्हणले जातं असंही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे तिवारी आता काय निर्णय घेतात हे पाहण महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube