Babasaheb Deshmukh on Shahaji Bapu Patil : सामान्य माणसाला घर मिळत (Deshmukh) नाही किंवा मिळण्यासाठी आडचण होते हे आपण कायम ऐकलं असेल. मात्र, हे खर आहे की, एका आमदारालाही घर मिळत नाही आणि ते आणखीही मिळालेलं नाही. ही सगळी घटना घडली आहे ती सांगोल्याचे स्व. गणपतराव देशमुख यांचे नातु आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत. नक्की काय घडलं होत याबाबत त्यांनी लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी संपादक योगेश कुटे यांनी देशमुख यांना अनेक गोष्टींवर बोलत केलं आहे.
शेतकऱ्यांना गुडन्यूज! जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 174 कोटींचे अनुदान; मंत्री विखेंची माहिती
तुम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता की, आमदारांना घर मिळत नाही. मग, मिळाले का घर असा प्रश्न विचारला असता देशमुख म्हणाले, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आयोग्याच्या कारणाने ती रुम सोडली नाही. सांगोल्याच्या आमदारासाठी जी रूम असते ती रूम आजंही शहाजी बापू यांच्याकडं आहे. दरम्यान, मी आरोग्य क्षेत्रातील असल्याने मला कल्पना आहे की, आरोग्याच्या समस्या असल्याने काय होत. त्यामुळे मी शहाजी बापू यांना काही बोललो नाही. मात्र, आमची दुसरीकडे कुठ सोय करायला पाहीजे होती पण ती केली नाही याबद्दल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसंच, मी रुमबद्दलचा प्रश्न विधानसभेत विचारण्याचं कारण म्हणजे, मतदारसंघातील अनेक काम घेऊन लोक माझ्याकंड येत असतात. कुठही राहण त्यांना परवडत नाही. त्यांना जास्त काही माहितही नसत. त्यामुळं त्यांचीही काम झाली पाहिजेत अशी भावना आपली असते. तसच, मी कुठही राहू शकतो. परंतु, जे माझ्याकडं लोक आले आहेत त्यांना राहण्यासाठी आपल्याला काही सोय करता आली पाहिजे या भावनेतून आपण विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला असंही आमदार बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले आहेत.