शेतकऱ्यांना गुडन्यूज! जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 174 कोटींचे अनुदान; मंत्री विखेंची माहिती

PM Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम 2024-25 मधील पिकांच्या झालेल्या (PM Crop Insurace Scheme) नुकसानीपोटी जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना सरक्षण कवच उपलब्ध करून दिले आहे. 2024-25 या वर्षात या योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार रब्बी हंगाम 2024-25 मध्ये जिल्ह्यातील 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान मंजुर झाले. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती पाहून झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील 8 हजार 467 शेतकऱ्यांना 5 कोटी 61 लाख आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून 9 हजार 50 शेतकऱ्यांना 11 कोटी 23 लाख रुपयांचे अनुदान वर्ग झाले आहे.
नववर्षात शेतकऱ्यांना गुडन्यूज! डीएपी खत स्वस्तात मिळणार; सरकारकडून अनुदान जाहीर
खरीप हंगाम 2024-25 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून 174 कोटी 95 लाख रुपये अनुदान मंजुर झाले आहे. अनुदान मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या दोन लाखांहून अधिक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.