शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा ‘त्या’ वक्तव्यावरून यू टर्न… त्यांच्या बापालाही कॉपी जमणार नाही

MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माजी कॉपी करणं जमणार नाही. (Gaikwad) मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार प्रतिवाद झाल्यानंतर आता यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
महाराष्ट्रात आणि देशात काल महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यात माझ्या मतदारसंघात सुद्धा बॉक्सिंग मारतानाचा प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. याबाबत मला विचारले असता मी उत्तर दिले होते की. माझं प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभाठाच्या कार्यकर्त्याच्या बापाची अवकात नाही, असं म्हटलं होतं. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचे नाव केलं. माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला असं ते म्हणाले.
विरोधकांना सोडा ठाकरेंच्या बापालाही माझी;शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली
बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने उद्धव साहेबांचे वडील आहेत. पण बाळासाहेब हे सर्वांचे दैवत आहेत व सर्वांचे बाप आहेत. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचीच शिकवण आहे. मी उभाठाच्या कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राज्यात फक्त 20 जागा देऊन जनेतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते, ते आता बाहेर रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी सुधारावं असंही ते म्हणाले होते.
संजय गायकवाड म्हणाले होते की, उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले, त्यांना काही काम राहिलेलं नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही. विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा. पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. कारण आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. भाजपाला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय. सर्व पक्षांना आपापलं काम करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.