मृत्यूचं तांडव! बच्चू कडूंनी सरकारला घेरलं; म्हणाले, 75 वर्षांनंतरही..,

Bachchu Kadu : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं, त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही बालकांचा मृत्यू झाल्याने राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे,. अशातच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, अन् शिवसेनेला 75 वर्षानंतरही सरकारला जनतेचा विश्वास जिंकता आला […]

Lok Sabha 2024 : "..तरच आम्ही लोकसभेत भाजपसोबत राहू"; बच्चू कडूंचा कोंडी करणारा इशारा

Lok Sabha 2024 : "..तरच आम्ही लोकसभेत भाजपसोबत राहू"; बच्चू कडूंचा कोंडी करणारा इशारा

Bachchu Kadu : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं, त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही बालकांचा मृत्यू झाल्याने राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे,. अशातच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, अन् शिवसेनेला 75 वर्षानंतरही सरकारला जनतेचा विश्वास जिंकता आला नसल्याचं कडू म्हणाले आहेत.

पोलिस महासंचालकपदाच्या रेसमध्ये रश्मी शुक्ला?; महाराष्ट्राला पहिल्या महिला DGP मिळणार

पुढे बोलताना ते म्हणाले, ठाण्यानंतर आता नांदेडमध्येही 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला, कुठेतरी आरोग्य सेवा त्यांना मिळत नसल्याचा आरोप या ठिकाणी होत असताना बच्चू कडू म्हणतात की, आमदारांना सरकारी कर्मचाऱ्यांना वेगळं हॉस्पिटल आणि सामान्य नागरिकांना वेगळे हॉस्पिटल हे कुठेतरी विषमतेचा जो रोग रोवला जात आहे ते थांबवलं पाहिजे. गेल्या 75 वर्षानंतर आजही सरकारला भरोसा निर्माण करता आला नाही. मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की शिवसेना असो या भाजप असो. त्यामुळे या सर्वांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Video : “तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातूनही अशीच धक्कादायक बातमी समोर आली. येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही हादरून गेले आहे.

नांदेड दुर्घटना! नर्सेसच्या बदल्या, डॉक्टरांची कमतरता; चव्हाणांनी सांगितली सत्य परिस्थिती

या रुग्णालयात काहीच दिवस पुरेल इतका औषधसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी हे एक महत्वाचे रुग्णालय आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हे तसेच राज्याच्या अन्य भागांतूनही येथे रुग्ण उपचारासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात.

बॉलिवूडचा खिलाडी कुमारने केली आगामी सिनेमाची घोषणा; ‘Sky Force’ मध्ये दिसणार नव्या भूमिकेत

नांदेड आणि घाटी रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवामुळे राज्यात चांगलच वातावरण तापलं आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असतानाच आता राजकीय क्षेत्रातील सर्वच नेत्यांकडून सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. या घटनेप्रकरणी शासनाने तत्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

दरम्यान, नांदेड घटनेप्रकरणी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून रुग्णालयात औषधे आणि डॉक्टरांची कमतरता नव्हती. रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशीत दौषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Exit mobile version