पोलिस महासंचालकपदाच्या रेसमध्ये रश्मी शुक्ला?; महाराष्ट्राला पहिल्या महिला DGP मिळणार
Rashmi Shukla : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला(Rashmi Shukla ) यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. सध्या रजनीश सेठ(Rajnish Seth) हे राज्याचे पोलिस महासंचालक असून त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, त्यामुळे आता पोलिस महासंचालक पदासाठी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे.
Mission Raniganj: परिणीती अन् खिलाडीचा ‘मिशन रानीगंज’मधील पहिलं गाणं प्रदर्शित
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला फोन टॅपिंगच्या प्रकरणात चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांसह नेत्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची चौकशीही सुरु करण्यात आली होती.
Nanded Civil Hospital Death : खुनी सरकार म्हणत सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांनी शिंदे सरकारला घेरले
कोण आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनूसार राज्यात सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांची ओळख आहे. सध्या त्या अतिरिक्त पोलिस महासंचालक CISF हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार तसेच रश्मी शुक्ला यांनी विविध मोठी पदे भुषवलेल्या एकमेव महिला अधिकारी आहेत.
अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, नांदेडच्या घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर सडकून टीका
सध्या त्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदाच्या रेसमध्ये आहेत. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यास राज्याला पहिल्या महिला पोलिस महासंचालक मिळणार आहेत. 1986 बॅचचे एस. पी. यादव, संजय पांडे, तसेच 1987 च्या बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी. कनकरत्नम, 1988 च्या बॅचचे के व्यंकटेशम हे त्यांचे समकक्ष बॅचचे अधिकारी आहेत.
दसरा मेळाव्यावरुन रणकंदन; ‘चिरडून टाका’ म्हणणाऱ्या राऊतांना शिरसाटांनी सुनावलं…
रजनीश शेठ यांचा कार्यकाळ डिसेंबरपर्यंत राहिला आहे. त्याआधी ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचं समोर येत आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेण्याआधीच रजनीश शेठ निवृत्ती घेणार असल्याचं बोललं जात आहे.
नगर दक्षिणेत पुन्हा विखे-गडाख; 1991 ची पुनरावृत्ती होणार? शंकरराव गडाखांनी सांगितलं
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच रश्मी शुक्ला मुंबईच्या पोलिस आयुक्त होणार असल्याचं बोललं जातं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेतल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात या भेटीबद्दल गुप्तगू सुरु होते. त्यानंतरच आता पोलिस महासंचालकपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.