Download App

अजितदादांची घरातच कुस्ती चाललीये; नांदगावकरांचा मिश्किल टोला

  • Written By: Last Updated:

Bala Nandgaonkar on Ajit Pawar :  मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे. राज्यांमध्ये सध्या अनेक कुस्त्या सुरू आहेत. एका नेत्याची दुसऱ्या नेत्याबरोबर कुस्ती सुरू आहे. अशातच आपल्या राज साहेबांनी एन्ट्री केल्यास काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे, असे ते म्हणाले आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे यावेळी एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. तेव्हा त्यांनी आमच्या पक्षाने देखील मुंबईत काल कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता असे सांगितले. त्यावर बोलताना पुढे ते म्हणाले की, राज्यामध्ये सध्या इतक्या कुस्त्या चालू आहेत, त्यामध्ये आमच्या लोकांनी पण कशाला कुस्त्यांची स्पर्धा आयोजित केली, असे मी त्यांना म्हणालो.

‘मूठभर मैदान अन् मूठभर संख्या’; मविआच्या सभेवरुन शेलारांचा टोला

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुस्ती सुरू आहे. तर अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरू आहे, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. तसेच बारसूमध्ये एक कुस्ती सुरू आहे. आता सहा तारखेला राज ठाकरे यांची देखील सभा होणार आहे. या कुस्त्यांमध्ये राज साहेबांनी एन्ट्री केल्यास काय होईल? हे तुम्हाला माहितीच आहे, असे ते म्हणाले आहेत.

मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले

दरम्यान, यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या काही दिवसांपूर्वी लोकमत वृत्तवाहिनीचा मुलाखतीवर देखील भाष्य केले. त्यांची मुलाखत अतिशय छान झाली. अमोल कोल्हे यांनी आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले. यानंतर मी डॉक्टर कोल्हे यांना फोन करून त्यांचे आभार मानले. तसेच अमृता फडणवीस यांना देखील फोन करून त्यांचे आभार व्यक्त केले, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us