Download App

शेतकऱ्यांनो, राज्यात संथ गतीनं मान्सूनची सुरुवात पण…, स्कायमेटचा पहिला अंदाज

Skymet On Monsoon 2025 : राज्यातील अनेक शहरात पारा 40 अंशावर गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता

  • Written By: Last Updated:

Skymet On Monsoon 2025 : राज्यातील अनेक शहरात पारा 40 अंशावर गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष यंदा राज्यात मान्सूनचं (Monsoon 2025) प्रमाण कसं असणार याकडे लागले आहे. यातच मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून (Skymet) पहिला अंदाज जारी करण्यात आला आहे. स्कायमेटच्या या अंदाजानुसार राज्यात यंदा मान्सूनची सुरुवात संथ गती होण्याची शक्यता आहे. स्कायमेटनुसार, राज्यात मान्सूनचं आगमन जूनमध्ये होणार मात्र तो संथ गतीने पुढं सरकरणार असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात जुलै (July) , ऑगस्ट (August) आणि सप्टेंबरमध्ये (September) चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण देशात यंदा 103 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो अशी माहिती या अंदाजात देण्यात आली आहे.

स्कायमेटने सांगितले की, सध्या ला लीनाची स्थिती बदलत आहे मात्र तरीही देखील देशात यंदा मान्सून सामन्य स्थितीमध्ये राहणार असून यंदा देशात सरासरी 103 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज 40 टक्के इतका असल्याची माहिती देखील स्कायमेटने दिली आहे. तर अतिवृष्टीची शक्यता दहा टक्के असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता स्कायमेट वर्तवली आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी 158.7 मीमी , जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक 286.1 मीमी ऑगस्ट महिन्यात 275.3 मिमी आणि सप्टेंबरमध्ये 174.6 मिमीटर पाऊस पडू शकतो. अशी माहिती देखील स्कायमेटने दिली आहे.

दोन मुलांना जन्म दिला अन्…, न्यायालयाचा पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि जम्मू -काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार, CM फडणवीसांनी दिले आश्वासन

follow us