Nagpur Crime : नागपूरमध्ये आई आणि मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवत ते सोशल मीडियावर व्हायरल केलेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Crime) येथील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पती दारूच्या आहारी गेल्याने पत्नीचे एका ड्रायव्हरशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याचे घरी येणे जाणे सुरू झाले. मुलगी वयात येताच, तिचाही त्याच्यावर जीव जडला. याचाच फायदा घेत, त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करीत आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून आई आणि मुलीचे व्हिडिओ तयार करीत, चक्क ते व्हायरल केले.
कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! बसवरील हल्ल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला दोन मुलीसह जरीपटका परिसरात राहते. तिचे ड्रायव्हर असलेला ४२ वर्षीय व्यक्तीशी बारा वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यातून दोघेही एकमेंकांशी भेटायचे. अधूनमधून रमेश त्यांच्या घरीही यायचा. त्यावेळी मुली लहान असल्याने तो तिच्याशीही बोलायचा.
मुली मोठ्या झाल्या. महिलेच्या मोठ्या मुलीचेही या व्यक्तीवर प्रेम जडले. याचाच फायदा घेत, त्यानेही तिच्याशीही लगट करण्यास सुरुवात केली. महिला घरी नसल्यावर तो घरी यायचा. याशिवाय तिच्याशी व्हिडिओ चॅट करीत, तिचे अश्लील व्हिडिओही बनवायचा. केवळ तिचेच नव्हे तर तिच्या आईचेही त्याने अनेक व्हिडिओ तयार केले होते. त्यातून त्याने त्यांच्यावर अनेकदा अत्याचारही केला.
काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने मुलीचे व्हिडिओ इन्टाग्रामवर टाकल्याने मुलीसोबतच्या प्रेमाचे बिंग फुटले. महिलेला ही बाब कळताच, तिने याबाबत मुलीला विचारणा केली. मात्र, महिलेचे त्याच्याशी असलेल्या संबंधाची माहिती मुलीला झाल्याने तिने आईला प्रतिप्रश्न केला. त्यावर तिने मुलीच्या व्हिडिओवरून तो ब्लॅकमेल करीत असल्याची बतावणी केली. ही बाब लहान बहिणीलाही माहिती झाली. त्यावरून महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची चौकशी करीत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.