Download App

MPSC कडून पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिध्द; पद संख्या अन् अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या…

  • Written By: Last Updated:

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 274 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट आणि गट ब यासाठी 205 जागा असणार आहेत. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब यासाठी 26 जागा आहेत. त्याचबरोबर महसूल आणि वन विभागामध्ये महाराष्ट्र वनसेवा गट आणि गट ब यासाठी 43 अशा तब्बल 274 जागा असणार आहेत.

इंडिया आघाडी भक्कम होत असल्याने भाजपला पोटशूळ; अतुल लोंढेची सडकून टीका

अटी आणि मर्यादा काय?

या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. त्यानुसार राज्यसेवा परीक्षा यासाठी उमेदवाराने पदवीधर असणे किंवा 55 गुणांसह बीकॉम/ सीए/आयसीडब्ल्यूए/एमबीए किंवा सिव्हिल इंजिनिअरची पदवी असणे गरजेचे आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी सिव्हिल इंजिनिअरची पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यासाठी वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी /प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजीनियरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी असणे गरजेचे आहे. तर संबंधित उमेदवाराचे वय हे 1 एप्रिल 2024 रोजी 18 /19 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. तर मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ या प्रवर्गासाठी पाच वर्ष शिथिल करण्यात आले आहे.

‘आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी…’; विखेंचा विरोधकांना टोला

तसेच या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 रुपये शुल्क लागणार आहेत. तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी 344 रुपयांची शुल्क ठेवण्यात आले. तसेच या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 ही असणार आहे. गेल्या कित्येत दिवसांपासून विद्यार्थी या परिक्षेच्या जाहिरातीची वाट पाहत होते. अखेर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तसेच दि.29 डिसेंबर, 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीतभरतीप्रक्रियेतून बाहेर पडता येणार आहे.

follow us