MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात, ‘इतक्या’ पदांसाठी निघाली भरती

  • Written By: Published:
MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात, ‘इतक्या’ पदांसाठी निघाली भरती

महाराष्ट्र शासनाच्या (Government Of Maharashtra) विविध विभागातील ६७३ पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची (MPSC) जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, दि. ४ जून २०२३ रोजी ही परीक्षा होईल.

हेही वाचा : Aurangabad : फतेहनगर, औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर, नामांतराचा इतिहास, मागणी किती जुनी आहे?

मागील काही महिन्यापासून राज्यात आयोगाच्या नव्या परीक्षा पद्धतीला विरोध करत आंदोलन चालू होते. दोन दिवसापूर्वी २०२५ पर्यंत जुन्या परीक्षा पद्धतीवरच परीक्षा घेण्यात येणार असल्याचं आयोगाकडून जाहीर केलं. आज त्याच पार्श्वभूमीवर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

विविध विभागातील ६७३ पदाकरिता हि भरती होणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे

सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे
पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे
सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे
अन्न व नागरी विभागात ३९ पदे

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल या भरतीसंबंधातली सविस्तर जाहीरात वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता

खालील पदांसाठी असणार भरती

उपजिल्हाधिकारी एकूण ९ पदे
राज्यकर सहाय्यक आयुक्त एकूण १२ पदे
गट विकास अधिकारी एकूण ३६ पदे
सहाय्यक संचालक, वित्त व लेखा सेवा एकूण ४१ पदे

सहाय्यक कामगार आयुक्त एकूण २ पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एकूण ५१ पदे
मंत्रालय कक्ष अधिकारी एकूण १७ पदे
लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष एकूण १ पदे

सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण ५० पदे
मुख्याधिकारी एकूण ४८ पदे
उपअधीक्षक भूमी अभिलेख एकूण ९ पदे
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क एकूण ४ पदे

कौशल्य विकास, रोजगार अधिकारी एकूण ११ पदे
उदयोग अधिकारी एकूण ४ पदे
सहायक कार्यकारी अभियंता एकूण ८९ पदे
सहायक अभियंता एकूण १ पदे

सहायक कार्यकारी अभियंता एकूण १० पदे
जल संधारण अधिकारी एकूण १० पदे
सहायक अभियंता – विद्युत एकूण १५ पदे
निरीक्षक, वैद्य मापन शास्त्र एकूण ३९ पदे
अन्न सुरक्षा अधिकारी एकूण १९४ पदे

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube