इंडिया आघाडी भक्कम होत असल्याने भाजपला पोटशूळ; अतुल लोंढेची सडकून टीका
मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली. आता वंचित बहुजन आघाडी देखील इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसं पत्रही इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडी भक्कम होत असल्यानं भाजपला पोटशुळ उठला आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली.
‘आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी…’; विखेंचा विरोधकांना टोला
अतुल लोढें म्हणाले की, देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर देशपातळीवर इंडिया आघाडी होत आहे. राज्यात महाविकास आघाडी अभेद्य आहे आणि यात वंचित बहुजन आघाडी जोडली जाणार असल्याने भितीने भाजपाला पोटशूळ उठला आहे. त्यामुळं दिशाभूल करणारी माहिती काही सुपारीबाज पत्रकार पसरवत आहेत, असं लोढे म्हणाले.
Ram Mandir Ayodhya : लालकृष्ण अडवाणींशिवाय राम मंदिर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण | LetsUpp Marathi
ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील समावेशासंदर्भात एका पत्रकारने सोशल मीडियावर जाणीवपूर्वक धादांत खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली आहे. कोणीतरी पत्रकार येतो आणि मी अशी चर्चा ऐकली आहे असे सांगत सुटतो हे शक्य आहे का? आघाडी संदर्भातील महत्वाची चर्चा सुरु असताना असा कोणी पत्रकार तिथे बसू शकतो का? हा साधा प्रश्न आहे. आणि पत्रकारासमोर आघाडी संदर्भातील महत्वाची चर्चा कोणी नेता करेल का? षडयंत्र रचणाऱ्या अशा पत्रकाराने सुपारीबाजपणा करायचे सोडून द्यावे. भाजपाच्या अशा कितीही सुपाऱ्या घेतल्या तरी भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव होणार आहे त्यामुळे अशा सुपाऱ्याने काहीही फरक पडणार नाही, असेही लोंढे म्हणाले.
आंबेडकरांनी लिहिलं इंडिया आघाडीला पत्र-
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी खूपदा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाटणा, बेंगळुरू येथे इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. त्यानंतर मुंबईत तिसरी बैठक झाली. या बैठकीला आंबेडकरांना बोलावले जाण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पत्र लिहून नवा फॉर्म्युला सुचवला आहे. आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रत्येकी १२ जागांवर निवडणूक लढवतील, तर वंचित राहिलेले १२ जागांवर निवडणूक लढवतील, असा फॉर्म्युला आंबेडकरांनी सुचवला आहे.