‘आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी…’; विखेंचा विरोधकांना टोला

  • Written By: Published:
‘आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी…’; विखेंचा विरोधकांना टोला

अहमदनगर : आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यातच खासदार सुजय विखेंकडून (MP Sujay Vikhe) सुरु असलेली साखर पेरणी सध्या जिल्ह्यात चांगलीच गाजू लागली आहे. नुकतेच साखर वाटपावरून विखेंनी विरोधकांना शाब्दिक टोले लगावले. साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आमची साखर ज्यांना आवडत नाही, त्यांनी ती घेऊ नये, आम्ही साखर वाटून मते मिळवणारे लोक नाही. आमचे जनतेची असलेल्या ऋणानुबंधातून आम्ही हे काम करतो आहे, अशा शब्दात खासदार विखेंनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक निशाणा साधला आहे.

तुझा किरीट सोमय्यासारखा व्हिडिओ व्हायरल करेन…व्यावसायिक अडकला हनी ट्रॅपमध्ये 

आदर्श गाव मांजरसुंबा येथे विविध विकास कामाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना विखे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मांजरसुबा गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून आणल्या असून त्याचे काम सुरू आहे. तसेच नगर एमआयडीसी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहे. या एमआयडीसीमुळे पुढील एक वर्षांमध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Ram Mandir Ayodhya : लालकृष्ण अडवाणींशिवाय राम मंदिर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण | LetsUpp Marathi 

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. साखर वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी ती घेऊ नये, आम्ही साखर वाटून मते मिळवणारे लोक नाहीत, आमचे जनतेची असलेल्या ऋणानुबंधातून आम्ही हे काम करतो आहे, अशा शब्दात विखेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले, आदर्श गाव मांजरसुंबा याठिकाणी गोरक्षनाथ गड आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, त्यांच्यासाठी तसेच वन विभागाच्या जागेवर पर्यटन स्थळाची निर्मिती व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्याला यश आले असून सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले आहे, त्यामुळे मांजरसुंबा गावाला पर्यटनातून चालना मिळेल व ते एक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल, असं मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube