Mukhyamantri Ladaki Bahin Yojana 44 lakh online applications in 2 weeks : नुकतीच राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) दोन आठवड्यांमध्ये तब्बल 44 लाख महिलांनी ऑनलाइन पद्धतीने (online applications) अर्ज केले आहेत. तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या महिलांचा आकडा लवकरच समोर येईल. अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली.
बैठकीला दांडी! नितीन देशमुखांनी तहसीलदार अन् कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं
एक जुलै 2024 पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असणार आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी तब्बल 46000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
योजना नेमकी काय?
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तरी काय? त्या योजनेसाठी कोण पात्र आहेत? त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? जाणून घेऊया…
Gharat Ganapati : ‘घरत गणपती’ साठी डॉ. शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे एकत्र
या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शिवाय जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावं अशी आहे.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
महाराष्ट्रातील 21 ते 6 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :
1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार.
4) लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1) रेशन कार्ड
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.
4) उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते झेरॉक्स.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.